Corona vaccine-लसीकरणाची तयारी पूर्ण, कोव्हिड व्हॅक्सीन लस कोल्हापूर जिल्ह्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:14 PM2021-01-13T17:14:26+5:302021-01-13T17:18:24+5:30

Corona vaccine Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात शनिवार दि. 16 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी 37 हजार 580 कोव्हिड व्हॅक्सीन आज जिल्ह्यात दाखल झाले. याबाबत लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून महापालिका क्षेत्रात 6 आणि जिल्ह्यातील 8 केंद्रांवर याचा प्रारंभ शनिवारी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.

Preparations for vaccination completed, covid vaccine introduced in Kolhapur district | Corona vaccine-लसीकरणाची तयारी पूर्ण, कोव्हिड व्हॅक्सीन लस कोल्हापूर जिल्ह्यात दाखल

Corona vaccine-लसीकरणाची तयारी पूर्ण, कोव्हिड व्हॅक्सीन लस कोल्हापूर जिल्ह्यात दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देकोव्हिड व्हॅक्सीन लस कोल्हापूर जिल्ह्यात दाखलशनिवारी होणाऱ्या लसीकरणाची तयारी पूर्ण : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर: जिल्ह्यात शनिवार दि. 16 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी 37 हजार 580 कोव्हिड व्हॅक्सीन आज जिल्ह्यात दाखल झाले. याबाबत लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून महापालिका क्षेत्रात 6 आणि जिल्ह्यातील 8 केंद्रांवर याचा प्रारंभ शनिवारी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.

       कोव्हिड-19 लसीकरणाच्या नियोजन मोहिमेचा शुभारंभ शनिवारी होणार असून या अनुषंगाने मोहिमेचे नियोजन व पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी कोव्हिड व्हॅक्सीन लसीकरण मोहीम जिल्हा कृतीदल समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. फारूख देसाई यांनी याबाबत संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी  देसाई यावेळी म्हणाले, या लसीकरण मोहिमेसाठी  सामाजिक संस्था, वैद्यकीय संघटना, खासगी डॉक्टर्स या सर्वांचा सहभाग घ्यावा. त्यासंदर्भात त्या सर्वांची बैठक आयोजित करावी. त्यामध्ये धर्मगुरूंनाही निमंत्रित करावे. शनिवारी सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी सर्व लोकप्रतिनिधींना नजिकच्या केंद्रांवर शुभारंभ प्रसंगी निमंत्रित करावे.

या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक आदी उपस्थित होते.

एकूण 14 केंद्रांवर लसीकरण

महापालिका क्षेत्रात 6 आणि जिल्ह्यातील 8 केंद्रांवर अशा एकूण 14 केंद्रांवर प्रत्येक केंद्रांवर 100 लाभार्थीप्रमाणे लसीकरण करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांच्या समन्वयातून लसीकरण मोहीम यशस्वी करावी.


 

Web Title: Preparations for vaccination completed, covid vaccine introduced in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.