शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Corporation Election: बंडखोरी टाळण्यासाठी सर्वांची स्वबळावर लढण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 16:20 IST

राजकीय पक्षांचा बी प्लॅन तयार

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची वेळ जसजशी जवळ येईल तसे महायुती व महाविकास आघाडीकडून स्वबळाचे नगारे वाजविले जाऊ लागले आहेत. अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेणार असले तरी स्थानिक पातळीवर मात्र प्रभागांनिहाय इलेक्टीव्ह मेरिट असलेल्या जास्तीत जास्त उमेदवारांची यादी करण्यावर भर दिला जात आहे. निवडणूक वेगवेगळी लढून नंतर एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा ‘कोल्हापूर पॅटर्न’ नवा नसल्याने सर्वच पक्ष बी प्लॅनदेखील तयार करताना दिसत आहेत.कोल्हापूर महानगरपालिकेच्या २००५ पासूनच्या सर्वच निवडणुका वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी स्वतंत्र लढविल्या आहेत. निवडणूक निकाल लागल्यानंतर सोयीने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करून एक वेगळा पॅटर्न तयार केला होता. नंतर हाच पॅटर्न महाराष्ट्रात २०१९ मध्ये भाजपला धक्का देण्याच्या हेतूने राज्य सरकार बनविताना काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांनी राबविला होता आणि तो यशस्वीही झाला होता.राज्यात २०२० ते २०२३ या काळात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. त्यातून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांची विभागणी झाली. २०२४ च्या राज्यातील निवडणुकीत भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची महायुती तर काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी झाली. विधानसभेत महायुतीने बाजी मारली. सत्ता स्थापन केली. त्यानंतर महायुती अधिक मजबूत झाली. अनेकांनी महायुतीतील पक्षात प्रवेश केले. पण आता हेच पक्षप्रवेश डोकेदुखी झाली आहे.राष्ट्रवादी अजित पवार, शिंदेसेनेत रस्सीखेचसध्या राज्यात आणि केंद्रात महायुती सत्तेत असल्याने भाजप, शिंदे सेने, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ज्या पद्धतीने मुंबई, नवी मुंबई, ठाणे महानगरपालिकेत भाजप, शिंदे सेना यांच्यात रस्सीखेच सुरू आहे तशीच रस्सीखेच अन्य महानगरपालिकेत सुरू झाली आहे.त्यामुळे स्थानिक पातळीवर कोल्हापूर महानगरपालिकेसाठीही ती होऊ लागली आहे. यात शिंदेसेनेने आघाडी घेतली आहे. चाळीसहून अधिक माजी नगरसेवकांना शिंदे सेनेने आपल्या पक्षात घेतले. पाठोपाठ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही तयारी सुरू केली आहे. आजच्या घडीला राष्ट्रवादीकडे ६५ इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार, उद्धवसेनेत चढाओढ कमी

काँग्रेस, उद्धव सेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमेदवारी मागण्यात तितकी चढाओढ दिसत नाही. काँग्रेसकडून ४० ते ५० उमेदवारांची यादी तयार केली आहे. परंतु अन्य दोन पक्षांची तेवढी ताकद नसल्याने आमदार सतेज पाटील सांगतील त्याप्रमाणे जागा वाटप, उमेदवारांची अदलाबदल होऊ शकते.

सगळेच स्वतंत्र लढल्यास ....

  • पक्षातील इच्छुकांना न्याय देणे शक्य
  • बंडखोरीचा धोका कमी होईल
  • पक्षनेतृत्वाला निवडणुकीवर नियंत्रण ठेवणे शक्य
  • पक्षाचे चिन्ह, धोरण घरोघरी पोहोचविता येईल
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Elections: Parties Prepare to Contest Independently to Avoid Rebellion

Web Summary : With Kolhapur municipal elections nearing, parties prepare to contest independently, aiming to accommodate more aspirants and curb rebellion. 'Kolhapur pattern' of post-election alliances remains a key strategy. Mahayuti and Mahavikas Aghadi factions gear up for independent fights.