शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबा चैत्र यात्रेची तयारी युद्धपातळीवर

By admin | Updated: April 7, 2017 00:30 IST

जोतिबा चैत्र यात्रेची तयारी युद्धपातळीवर

रस्त्यांचे रुंदीकरण : मंदिर रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : ‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबाची चैत्र यात्रा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रशासन, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, स्थानिक समिती व ग्रामपंचायतीने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यात मुख्य मार्गांवरील रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, लोखंडी रेलिंग, रंगरंगोटी आदींची कामे अंतिम टप्प्यात आहेत.यंदाचा यात्रेचा मुख्य दिवस सोमवारी (दि. १०) आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि गोवा आदी ठिकाणांहून सात लाखांहून अधिक भाविक जोतिबा डोंगरावर येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने विशेषत: शहर वाहतूक शाखेने जोतिबा डोंगर परिसरात ६० हजारांहून अधिक वाहनांसाठी वाहनतळ बनविला आहे. या वाहनतळाचे सपाटीकरण व रुंदीकरणही अंतिम टप्प्यात आले आहे. याशिवाय गिरोली फाटा, दाणेवाडी, गायमुख तलावाजवळील पडीक, शेतातील जागा, जोतिबा डोंगरावरील पिराचा कडा, यात्री निवास, जुने शासकीय विश्रामगृह, व्यापारी संकुल, यमाई बाग, आदी परिसरात वाहनतळाची जागा सपाटीकरण व रुंदीकरण काम सुरू आहे. त्यातील बहुतांशी काम पूर्णत्वाकडे आले आहे. जोतिबा डोंगर परिसरातील मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरणही अंतिम टप्प्यात आले आहे. सेंट्रल प्लाझा येथील दोन्ही बाजूंचे मुख्य गेटजवळील डांबरीकरण व बॅरेकेटिंगचे कामही पूर्णत्वाकडे आले आहे. मंदिराजवळील नगारखाना दक्षिण दरवाजाकडील काही दुकानांचे अतिक्रमण काढले असून हा परिसरही मोकळा श्वास घेऊ लागला आहे. मंदिर परिसरातील दर्शनरांग तीन पदरीऐवजी दुपदरी करण्यात आली आहे. त्यामुळे सासनकाठ्या नाचविण्यासाठी भाविकांना आणखी जागा उपलब्ध झाली आहे. यात्राकाळात लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने १६ सीसी टीव्ही कॅमेरे बसविले आहेत. याशिवाय भक्तांना दर्शन बाहेरूनच मिळावे, याकरिता सहा मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)गुलालाची उधळण जोतिबाला प्रिय अशा गुलाल-खोबऱ्याची उधळण केली जाते. यासाठी विशेष राजापुरी खोबरे लागते, तर गुलालासाठी खास सरपंच गुलालालाही विशेष मागणी आहे. याकरिता १७५ टन राजापुरी सुके खोबरे, तर १८ लाखाहून अधिक नारळांची आवक या काळात अपेक्षित आहे. तर गुलालाचीही तीनशे टनांहून अधिक उधळण केली जाते. याशिवाय जोतिबाला प्रिय असा ‘दवणा’ही वाहिला जातो. लाखो रुपयांच्या दवण्याची शेती ही केवळ पन्हाळा तालुक्यातील केखले गावातच केली जाते. गुलाल-खोबरे व नारळ आणि दवणा यांची मोठी उलाढाल अपेक्षित आहे. प्रसाद, पूजेचे साहित्य, खेळणी आदींची दुकानेही यात्रेसाठी सज्ज झाली आहेत. या संस्था भाविकांच्या सेवेसाठी सज्जसहज सेवा ट्रस्ट, व्हाईट आर्मी, यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय डॉक्टरांचे पथक, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज पथक, अनिरुद्ध उपासना संस्थेचे स्वयंसेवक व दुचाकी बंद पडल्यास ती त्वरित दुरुस्त करून देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन, आदी भाविकांच्या सेवेत असणार आहेत.दोन लाख भाविक घेणार लाभआर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त आयोजित मोफत अन्नछत्राचे यंदा २५ वे वर्ष आहे. या अन्नछत्राचे उद्घाटन श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. ९) होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या अन्नछत्राचा सुमारे दोन लाख भाविक लाभ घेतील, अशी माहिती आर. के. मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली. मेहता म्हणाले, यावर्षी ९ ते ११ एप्रिल या कालावधीत अन्नछत्राचे आयोजन केले आहे. हे अन्नछत्र जोतिबा डोंगरावरील एस. टी. स्टँडशेजारी भरविण्यात येणार आहे. येथे कळंबा येथील सिद्धकला महिला बचत गटाच्या ६० महिला योगदान देणार आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी वारणा दूध संघाच्यावतीने सोय करण्यात येणार आहे. यावेळी अनिल घाटगे, महादेव पाटील, व्ही. बी. शेटे, आण्णा राणे, सुभाष देशमाने, बाळासाहेब कांदळकर, मोहन हजारे, जगदीश हिरेमठ, सरोजिनी पाटील, रवी कांबळे, आदी उपस्थित होते.