शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

Kolhapur Politics: कागल, दक्षिण, राधानगरी विधानसभा मतदारसंघांत वातावरण तापू लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 14:22 IST

चंदगडमध्ये बहुरंगी लढत

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण सुरू असतानाच विधानसभेसाठी कागल, दक्षिण कोल्हापूर आणि राधानगरी मतदारसंघात वात लागली आहे. याचे लोण आता अन्य विधानसभा मतदारसंघातही पसरणार असून ऐन पावसाळ्यात वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शाहू छत्रपती विजयी झाल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. संपूर्ण देशासह राज्यात चांगले यश मिळाल्याने अतिशय हिरिरीने महाविकास आघाडी विधानसभेच्या जोडण्या घालायला लागली आहे. त्यामुळेच लोकसभा निकालाला महिना व्हायच्या आधीच विधानसभेसाठीच्या जोडण्या घालत इरादे स्पष्ट केले जात आहेत.शाहू छत्रपती यांच्या भुदरगड दौऱ्यावेळी माजी आमदार के. पी. पाटील यांनी स्वागत केले. यानंतर काही दिवसातच बिद्री कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा पडला. त्यानंतर कारखान्याच्या डिस्टिलरीचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. यावर के. पी. पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांना जबाबदार धरले असून पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, ए. वाय. पाटील यांनीही या कारवाईच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्याही पुढे जात आता आज कोल्हापुरात बिद्रीच्या सभासदांचा मोर्चा होणार आहे. त्यामुळे आबिटकर आणि के. पी. पाटील यांच्यातील लढाईला तोंड फुटले आहे.दुसरीकडे लोकसभेच्या निमित्ताने नाईलाजाने एका व्यासपीठावर दिसणाऱ्या हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी आपली ती हंगामी भूमिका होती असे स्पष्ट करत आपापल्या वाटा चोखाळायला सुरुवात केली आहे. नवोदिता घाटगे यांच्या २० लाखांच्या फसवणुकीवरून राष्ट्रवादीने समरजित यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे तर राधानगरीच्या लक्ष्मी तलावाच्या साक्षीने पुढच्या शाहू जयंतीला आमदारकीचा गुलाल लावून येणार असल्याचा आत्मविश्वास घाटगे यांनी व्यक्त केला आहे.

महाडिक आणि पाटील यांच्यात सतत काही ना काही आरोप, प्रत्यारोप सुरूच असतात. हद्दवाढीवरून शौमिका महाडिक यांनी ‘मग मागच्या पालकमंत्र्यांना काळे झेंडे का दाखवले नाहीत’ अशी विचारणा करत कळ काढल्याने काँग्रेसचे सचिन चव्हाण यांनीही ‘तुमच्या सासऱ्यांनी याबाबत कधी आवाज उठवला होता’, असा प्रतिप्रश्न विचारत प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे त्या त्या मतदारसंघात वाती लागलेल्या आहेत.

चंदगडमध्ये बहुरंगी लढत

  • चंदगडमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्याविरोधात भाजपकडून शिवाजीराव पाटील दावेदार असून आता या ठिकाणी नंदाताई बाभूळकर, अमर चव्हाण, अप्पी पाटील, गोपाळराव पाटील, सुनील शिंत्रे यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
  • शिरोळमध्ये आमदार विनय कोरे यांनी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची अशोकराव माने यांना सोबत घेऊन भेट घेतल्याने हातकणंगलेची लढाई चर्चेत आली आहे.
  • कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर यांनी ‘तयारी’ केली असून उद्धवसेनेकडून संजय पवार इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडून पुन्हा जयश्री जाधव यांना संधी दिली जाणार का, हा उत्सुकतेचा विषय आहे. करवीरमध्ये राहुल पाटील विरूद्ध चंद्रदीप नरके, पन्हाळ्यात विनय कोरे विरूद्ध सत्यजित पाटील असा सामना निश्चित आहे.
  • इचलकरंजीत विद्यमान आमदार प्रकाश आवाडे महायुतीच्या उमेदवारीचे प्रमुख दावेदार असून सुरेश हाळवणकर यांची भूमिका काय राहणार हे महत्वाचे आहे. यड्रावकर यांच्या विरोधात उल्हास पाटील रिंगणात उतरू शकतात.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारण