वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या, आता नंबर कोणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:23 AM2020-10-10T11:23:19+5:302020-10-10T11:25:52+5:30

transfars, seniorofficers, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आल्या. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, शहर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांचा यामध्ये समावेश आहे. आता पुढचा नंबर कोणाचा, असा सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. जिल्ह्याच्या मंत्र्यांचे शासकीय पातळीवर वजन नाही का? असेही यामध्ये म्हटले आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी केली आहे.

Premature transfers of senior officers, now whose number? | वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या, आता नंबर कोणाचा?

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या, आता नंबर कोणाचा?

Next
ठळक मुद्देकोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचा सवाल मंत्र्यांचे शासनदरबारी वजन आहे की नाही? : बदल्या रद्द करा

कोल्हापूर : जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आल्या. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, शहर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांचा यामध्ये समावेश आहे. आता पुढचा नंबर कोणाचा, असा सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. जिल्ह्याच्या मंत्र्यांचे शासकीय पातळीवर वजन नाही का? असेही यामध्ये म्हटले आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी केली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, महापूर आणि कोरोना संसर्गाच्या संकटत जनतेसाठी अठरा-अठरा तास काम करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणजे साक्षात देवदूतच कोल्हापूरला मिळाले. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख आणि शहर उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी तर या दीड वर्षात कोल्हापुरातील सर्व काळे धंदे नेस्तनाबूत करून काळे धंदेवाल्यांना मोक्का कायद्याचा हिसका दाखवून समाजाला घातक असणाऱ्या सर्व काळ्या धंद्यांचा बीमोड केला.

इतकेच नव्हे तर खुद्द पोलीस खात्यात असणाऱ्या काही घरभेदी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करून पोलीस खात्याची स्वच्छता केली. या सर्वांची दखल घेऊन राज्य पोलीस खात्याने प्रेरणा कट्टे यांच्या पथकास एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविले.

त्यांची बदली हा लोकशाहीविरोधातील अवैध काळे धंदेवाल्यांचा विजय मानावा लागेल. ही चर्चा चालू आहे तोवरच महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची अचानक तडकाफडकी बदली झाली. त्यांनी कार्यभार स्वीकारून दीड वर्ष झाले नाही तोवर बदली.

राज्य प्रशासनाला कोल्हापूरमध्ये असे लोकाभिमुख, प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी का नको आहेत, हेच समजत नाही, असे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, बाबासाहेब देवकर, माणिक मंडलिक,महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर, अजित सासने, कॉ. चंद्रकांत यादव, आदी यांनी पत्रकात म्हटले आहे.

मंत्रिमहोदय गप्प का

लोकाभिमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना राज्य प्रशासनाने जिल्ह्यातील मंत्र्यांना काही माहिती दिली होती की नाही? जर तुम्हाला या बदल्यांची माहिती होती तर तुम्ही गप्प का राहिलात? असा सवाल कृती समितीने उपस्थित करीत तुमचे वजन वापरून बदल्या रद्द करून त्यांची मुदत आहे तोवर त्यांना कोल्हापुरात कार्यरत ठेवावे अशी मागणी केली.

Web Title: Premature transfers of senior officers, now whose number?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.