शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

स्रावचाचणीसाठी नववी ते बारावीच्या शिक्षकांना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 17:51 IST

Teacher, Education Sector, collector, kolhapur, School स्रावचाचणी करून घेण्यासाठी सर्वच शिक्षकांनी कोविड चाचणी केंद्रांवर झुंबड उडविल्याने अखेर यामध्ये सुसूत्रीकरण आणण्यासाठी सरसकट शिक्षकांनी स्रावचाचणीसाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना करावे लागले. आता स्रावचाचणीसाठी नववी ते बारावीचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देस्रावचाचणीसाठी नववी ते बारावीच्या शिक्षकांना प्राधान्य ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली मुदत, गर्दी न करण्याचे आवाहन

कोल्हापूर - स्रावचाचणी करून घेण्यासाठी सर्वच शिक्षकांनी कोविड चाचणी केंद्रांवर झुंबड उडविल्याने अखेर यामध्ये सुसूत्रीकरण आणण्यासाठी सरसकट शिक्षकांनी स्रावचाचणीसाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना करावे लागले. आता स्रावचाचणीसाठी नववी ते बारावीचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.उद्यापासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करायचे असल्याने त्याआधी माध्यमिक शिक्षकांनी स्रावचाचणी करून घ्यावी आणि या महिनाअखेरपर्यंत प्राथमिक शिक्षकांनीही स्रावचाचणी करून घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेकडून करण्यात आल्या होत्या. परिणामी, कोल्हापूर शहरासह बाराही तालुक्यांतील शिक्षकांनी चाचणीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तही मागवावा लागला. आता अनेक कोविड उपचार केंद्रे बंद केल्यामुळे तालुक्यातील प्रत्येकी एका केंद्रावर मोठा ताण आला. हाच ताण शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेवरही पडला. त्यामुळे अहवाल विलंबाने मिळू लागले. जिल्हाधिकारी देसाई यांनी शुक्रवारी संध्याकाळी या परिस्थितीची माहिती घेतली आणि अन्य शिक्षकांनी चाचणीसाठी जाऊ नये असे आवाहन केले.

तसेच सर्वच माध्यमिक शिक्षकांनी चाचणीसाठी न जाता नववी ते बारावीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी चाचणीसाठी जावे. एका शाळेतील दोन-दोन शिक्षकांनी चाचणीसाठी जावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या चाचणीच्या अहवालास विलंब झाला तर अहवाल आल्यानंतर शाळा सुरू कराव्यात, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूरSchoolशाळा