शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
2
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
3
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 Live: मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता? एक्झिट पोलचे अंदाज काय?
4
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
5
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
6
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
7
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
8
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
9
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
10
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
11
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
12
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
13
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
14
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
15
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
16
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
17
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
18
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
19
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
Daily Top 2Weekly Top 5

मॉन्सूनपूर्व सरींचा कोल्हापूरला तडाखा, तासाभराच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 19:38 IST

Rain Kolhapur : ढगांच्या गडगडासह आलेल्या मॉन्सूनपूर्व सरींनी गुरुवारी दुपारी तासभर कोल्हापूरला अक्षरक्षा झोडपून काढले. दुपारी अंगतूक पाहुण्यासारख्या आलेल्या या सरींनी टपोऱ्या थेंबासह जोरदार बॅटिंग केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसाच्या जोरदार माऱ्यापुढे रेनकोट, छत्र्यांचा देखील टिकाव लागला नाही.

ठळक मुद्देमॉन्सूनपूर्व सरींचा कोल्हापूरला तडाखातासाभराच्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी : शिवारे पाण्याने तुंबली

कोल्हापूर : ढगांच्या गडगडासह आलेल्या मॉन्सूनपूर्व सरींनी गुरुवारी दुपारी तासभर कोल्हापूरला अक्षरक्षा झोडपून काढले. दुपारी अंगतूक पाहुण्यासारख्या आलेल्या या सरींनी टपोऱ्या थेंबासह जोरदार बॅटिंग केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसाच्या जोरदार माऱ्यापुढे रेनकोट, छत्र्यांचा देखील टिकाव लागला नाही.

धुवांधार पावसामुळे भरदुपारी सर्वत्र अंधार दाटल्याने वाहनाधारकांवर हेडलाईट लावून वाहने चालवण्याची वेळ आली. मोठ्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याच्याही घटना घडल्या. दरम्यान गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथे पोल्ट्रीची भिंती पडून तीन मजूर मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटनाही घडली.गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण होत होते, पण मोठ्या पावसाने हुलकावणी दिली होती. गुरुवारीदेखील सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्मा जाणवत होता. दुपारी दोननंतर वातावरण बदलू लागले. काळ्याभोर ढगांची आकाशात गर्दी वाढली आणि बघता बघता पावनेतीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला तुरळक असणाऱ्या पावसाने नंतर वेग पकडला आणि धुवांधार बरसण्यास सुरुवात केली.पावसाचा जोर इतका प्रचंड होता की क्षणात रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले. सखल भागांना तळ्याचे स्वरूप आले. पावसाच्या माऱ्यामुळे भर दुपारी अंधार पसरला. वाहनधारकांना हेडलाइट चालवून वाहने हाकावी लागली. चारनंतर पावसाचा जोर कमी झाला पण विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाट कायम होता. संध्याकाळपर्यंत तुरळक पाऊस सुरूच होता.जोरदार आलेल्या या पावसामुळे ओढे, नाल्यांना ओहळ आले. शहरातील जयंती नालाही ओव्हरफ्लो होऊन धबधब्यासारखा कोसळू लागला. शहरात अनेक घरात पाणी शिरल्याने पाऊस थांबल्यानंतर पाणी उपसण्याचे काम सुरु झाले. अजूनही बऱ्याच घरात पावसाळ्यापुर्वीची घरांची डागडुजी व शेकारणीची कामे लॉकडाऊनमुळे पूर्ण झालेली नाहीत. पावसाचा अंदाज आल्याने अनेक जण निवारा सुरक्षित ठेवण्यासाठी ताडपत्री टाकण्याची घाईगडबड करताना दिसत होते. तरीदेखील पावसाच्या प्रचंड माऱ्यामुळे गळती लागलीच. पाऊस थांबल्यानंतर साचलेले पाणी बाहेर काढण्याची कसरत करावी लागली. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर