‘करसहाय्यक’मध्ये राज्यात प्रल्हाद राठोड पाचवा

By Admin | Updated: March 9, 2017 19:01 IST2017-03-09T19:01:54+5:302017-03-09T19:01:54+5:30

अश्विनी चव्हाण नववी; ‘एमपीएससी’कडून निकाल जाहीर

Prahlad Rathod fifth in the state of 'Karasihayak' | ‘करसहाय्यक’मध्ये राज्यात प्रल्हाद राठोड पाचवा

‘करसहाय्यक’मध्ये राज्यात प्रल्हाद राठोड पाचवा

‘करसहाय्यक’मध्ये राज्यात प्रल्हाद राठोड पाचवा

अश्विनी चव्हाण नववी; ‘एमपीएससी’कडून निकाल जाहीर
कोल्हापूर : करसहाय्यक पदाच्या परीक्षेत कोल्हापुरातील प्रल्हाद धनसिंग राठोड याने राज्यात पाचवा, तर अश्विनी अशोक चव्हाण हिने नववा क्रमांक मिळविला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सन २०१६ मध्ये घेतलेल्या या परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी आॅनलाईन जाहीर केला.
करसहाय्यक पदाच्या ४५० जागांसाठी एमपीएससीने परीक्षा घेतली होती. या परीक्षेत पाचव्या क्रमांकाने यशस्वी झालेला प्रल्हाद राठोड हा मूळचा कोल्हापूरचा असून तो टिंबर मार्केट येथे राहतो. बी. कॉम. पदवीधर असलेल्या प्रल्हादने दोन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. यात गेल्यावर्षी तो एमपीएससीच्या लेखनिक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. यावर्षी १८८ गुणांसह त्याने करसहाय्यक परीक्षेत यश मिळविले आहे. राज्यात मुलींमध्ये नवव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली अश्विनी चव्हाण ही शिवाजीपेठेत राहते. तिला १७८ गुण मिळाले आहेत. बी. कॉम. पदवी मिळविलेल्या अश्विनीने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळविले आहे. तळगांव (ता. राधानगरी)मधील स्नेहल पाटील हिने १७२ गुणांसह तेरावा क्रमांक मिळविला. इचलकरंजीतील गंगानगरमधील सुशांत कराळे हा २०८ गुणांसह यशस्वी ठरला आहे. त्याचा राज्याच्या गुणवत्ता यादीत २९ वा क्रमांक आहे. हे यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थीनी कोल्हापुरातील अरुण नरके फौंडेशनच्या आहेत. त्यांचा गुरुवारी फौंडेशनचे संस्थापक अरुण नरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष बाळ पाटणकर, प्राचार्या शिल्पा देवगांवकर, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
..............................................................................
प्रतिक्रिया
दोन वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. अभ्यासातील सातत्य आणि अरुण नरके फौंडेशनमधील शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर यशस्वी ठरलो. एमपीएससीच्या वर्ग दोनचे पद मिळविण्यासाठी यापुढे प्रयत्न करणार आहे. माझ्या यशात आई-वडील, शिक्षकांचे पाठबळ महत्त्वाचे आहे.
- प्रल्हाद राठोड
......................................................................
या पदाच्या परीक्षेत पहिल्या वर्षी अपयशी ठरले. गेल्या वर्षी चार गुणांनी यशाने हुलकावणी दिली. त्यावर जिद्दीने अभ्यास करीत यावर्षी यशस्वी ठरले. यासाठी दिवसातील दहा तास अभ्यास करीत होते. विक्रीकर निरीक्षक होण्याचे ध्येय असून त्यादृष्टीने यापुढे तयारी करणार आहे.
-अश्विनी चव्हाण

Web Title: Prahlad Rathod fifth in the state of 'Karasihayak'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.