प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST2020-12-15T04:39:48+5:302020-12-15T04:39:48+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेकडील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्या कारभाराची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी प्रहार ...

प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचे उपोषण
कोल्हापूर : महानगरपालिकेकडील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्या कारभाराची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या चार कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जयराज कोळी, दगडू माने, अनिस मुजावर, अमोल काळे उपोषणास बसले आहेत. स्वच्छ भारत अभियान व राज्य शासनाच्या पैशांची उधळण करणे, पशुवैद्यकीय अधिकारी असूनही मूळ कामांकडे दुर्लक्ष करणे, मर्जीतील व्यक्तींना पात्रता नसताना पदभरती अशा विविध तक्रारी डॉ. पाटील यांच्या विरोधात केल्या आहेत.
डॉ. विजय पाटील यांच्या विरोधात काही विशिष्ट संघटना आंदोलन करत आहेत. यापूर्वीही त्यांच्या विरोधात महापालिकेसमोर अनेक दिवस आंदोलन करण्यात आले. त्यांच्या विरोधात कसलाच आरोप सिद्ध झाला नाही; परंतु त्यामुळे मुख्य आरोग्य निरीक्षकपदावरून त्यांची बदली मूळ पदावर करण्यात आली. सध्या त्यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे काम तत्कालिन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोपविले असून तेही उत्तम चालले आहे.