प्राथ. शिक्षक सेवा समितीतर्फे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:17 IST2021-07-18T04:17:25+5:302021-07-18T04:17:25+5:30
कोल्हापूर : ‘लोकमत’च्या ‘रक्ताचं नातं’ उपक्रमांतर्गत खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या सदस्यांनी शनिवारी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत माणुसकीचा धागा घट्ट ...

प्राथ. शिक्षक सेवा समितीतर्फे रक्तदान शिबिर
कोल्हापूर : ‘लोकमत’च्या ‘रक्ताचं नातं’ उपक्रमांतर्गत खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या सदस्यांनी शनिवारी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत माणुसकीचा धागा घट्ट केला. ३७ शिक्षक, शिक्षकांनी या वेळी रक्तदान केले.
खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या हस्ते स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी शिबिराला भेट देऊन सर्वांना धन्यवाद दिले. मुख्याध्यापक संघामध्ये हे शिबिर पार पडले. या वेळी भरत रसाळे म्हणाले, कोरोनाच्या काळात रक्ताची गरज पूर्ण करण्याचा ‘लोकमत’चा हा उपक्रम स्तुत्य असून आमच्या शिक्षक बांधवांनी रक्तदान करून ज्ञानदानाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. प्रास्ताविक खासगी प्राथ. शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व समितीचे विभागीय अध्यक्ष महादेव डावरे यांनी केले. सूत्रसंचालन कुमार पाटील यांनी केले. आभार पतसंस्थेच्या सचिव सारिका पाटील यांनी मानले.
या वेळी आनंदा हिरूगडे, महावीर सिदनाळे, अदिती केळकर, शिवाजी भोसले, उपाध्यक्ष बाळासाहेब लंबे, अशोक पाटील, राजेश कोडेकर, राजाराम हुल्ले, चंद्रकांत पाटील विकास कांबळे, मानसिंग हातकर, सूर्यकांत बरगे, मच्छिंद्र नाळे, आनंदा डावरे, छाया हिरूगडे, सविता गिरी, उज्ज्वला चोपडे, अनिल खोत, अरुण गोते, एस. एम. पाटील शिवाजी पाटील, पी. डी. आवळे, प्रवीण पाटील, विश्वास केसरकर, लाला पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
या वेळी २५ पेक्षा जास्त वेळा रक्तदान केल्याबद्दल मुख्याध्यापक पी. वाय. पाटील, सदाशिव साळवी व सुनील कांबळे यांचा ‘लोकमत’च्यावतीने सत्कार करण्यात आला. जीवनधारा ब्लड बँक व लोकमतच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
१७०७२०२१ कोल खासगी शिक्षक समिती
खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखाली ‘लोकमत’च्या ‘नातं रक्ताचं’ उपक्रमांतर्गत शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले.
छाया : आदित्य वेल्हाळ