कोल्हापुरात उसळल्या ऊर्जेच्या लाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 08:24 PM2020-01-05T20:24:19+5:302020-01-05T20:26:10+5:30

कोल्हापूर : अंगाला झोंबणाऱ्या गार वाºयाची तमा न बाळगता हजारो धावपटूंनी रविवारची पहाट संस्मरणीय केली. निमित्त होते ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या ...

 Power waves burst into Kolhapur | कोल्हापुरात उसळल्या ऊर्जेच्या लाटा

कोल्हापुरात उसळल्या ऊर्जेच्या लाटा

googlenewsNext
ठळक मुद्देआबालवृद्धांसह तरुणाईने लुटला ‘लोकमत महामॅरेथान’चा आनंद

कोल्हापूर : अंगाला झोंबणाऱ्या गार वाºयाची तमा न बाळगता हजारो धावपटूंनी रविवारची पहाट संस्मरणीय केली. निमित्त होते ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या तिसºया पर्वाचे. जल्लोषी वातावरणामध्ये या सर्वांनीच ही महामॅरेथॉन वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याने शहरामध्ये जणू काही पहाटऊर्जेच्या लाटाच उसळल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
‘लोकमत महामॅरेथॉन’चे यंदाचे हे तिसरे वर्ष. सर्वच सहभागींना ही स्पर्धा वेळेत सुरू होणार याची खात्री असल्याने, पहाटे पाचपासूनच पोलीस मैदानाकडे स्पर्धक येत होते. वाटेतच ठिकठिकाणी मार्गदर्शन करणारे फलक, पोलीस बंधूंचे मार्गदर्शन यांमुळे सर्वजण वेळेत मैदानावर पोहोचले.
मैदानावर आल्यानंतर तर अनेकजण भारावलेच. भव्य अशा या मैदानावर गाण्यांचा ठेका, विद्युत रोषणाईची झलक, सर्वांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी असलेले स्टॉल्स, नाश्त्याची कुपन्स वाटप ही सर्व प्रक्रिया पार पडली आणि जो-तो वॉर्मअप करू लागला. गाण्यांवर ताल धरत अनेकांनी आपला प्राथमिक व्यायाम पूर्ण केला आणि जो-तो आपल्या गटामध्ये धावण्यासाठी सज्ज झाला.
बरोबर साडेपाच वाजता मान्यवरांनी ध्वज दाखविले आणि कसलेल्या धावपटूंनी गतीनं पावलं टाकायला सुरुवात केली. तोपर्यंत १० किलोमीटर धावणारे तयार झाले. अशाच पद्धतीने पाच आणि तीन किलोमीटरच्या मॅरेथॉनला मान्यवरांनी ध्वज दाखविले. मिकी माऊसचा वेश धारण केलेली मुले, लेझीम खेळणाºया महाविद्यालयीन युवती, पोलिसांसह अल्फान्सो शाळेचा बॅँड, ठिकठिकाणी सोडण्यात येणारे फुगे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर अशा सगळ्या भारावलेल्या वातावरणामध्ये आपण इतके किलोमीटर धावलो आहे, हेदेखील अनेकांना कळले नाही.
चिकाटीने अनेकांनी अव्वल येण्यासाठी प्रयत्न केले, तर काहींनी ‘थांबायचं नाही’ म्हणत घाम पुसत-पुसत अंतर पूर्ण केले. प्रत्यक्ष खासदार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ, पोलीस उपअधीक्षक, उद्योजक अशी मान्यवर मंडळी आपल्यासोबत धावत आहेत, हे पाहूनही अनेकांना हुरूप आला.
स्पर्धा पूर्ण केल्यानंतर ढोलताशांच्या कडकडाटात फुलांच्या पाकळ्या उधळून स्पर्धकांचे स्वागत करण्यात येत होते. दुखणाºया पायांपेक्षाही शर्यत पूर्ण केल्याचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहताना दिसत होता. स्पर्धा झाल्यानंतरही जवळपास दोन तास सहभागी सर्वांजण पोलीस मैदानावर उपस्थित होते. नाश्ता घेत, एकमेकांशी गप्पा मारत स्पर्धक आणि सहभागी नागरिकांनी रविवारच्या या सकाळी आपले ‘रिलेशन्स’आणखी घट्ट केले. सेल्फ ी आणि फोटो पॉइंटवर झालेल्या गर्दीने तर अनेकांना रांगेत थांबावे लागले.

 

Web Title:  Power waves burst into Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.