शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्रात साडेचार कोटींच्या वीजचोऱ्या उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वीजतारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून विजेचा वापर करणाऱ्यांना दणका देत महावितरणने वीजचोरीविरोधात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : वीजतारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून विजेचा वापर करणाऱ्यांना दणका देत महावितरणने वीजचोरीविरोधात वेगाने मोहीम सुरू केली आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये गेल्या दीड महिन्यात नियमित व विशेष मोहिमेमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १८७६ ठिकाणी ४ कोटी ५७ लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ प्रमाणे फौजदारी कारवाई सुरू केली आहे. ५६६ प्रकरणांमध्ये ९९ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. वीजचोरीविरोधात मोहिमेला आणखी वेग देण्यासाठी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे हे स्वतः या मोहिमेत विविध ठिकाणी भेटी देऊन महावितरणच्या पथकांना मार्गदर्शन करीत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडहिंग्लज, इचलकंरजी, जयसिंगपूर, कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण एक व दोन या विभागांमध्ये वीजचोरीचे प्रकार उघड करण्यात आले. जिल्ह्यात ३५ ठिकाणी ५ लाख २० हजार रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आल्या. सर्वच ३५ प्रकरणांत ५ लाख २० हजार रुपयांचा दंड व वीज बिलांची वसुली करण्यात आली.

वीजचोरी प्रकरणात ज्यांनी दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीज वापराप्रमाणे संपूर्ण बिलाची रक्कम भरली नाही, तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. विद्युत अपघाताचा धोका असणाऱ्या विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घेऊन मोठ्या रकमेची दंडात्मक किंवा फौजदारी कारवाईमधील कारावासाची शिक्षा टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

फोटो : ०१०२२०२१-कोल-महावितरण

पश्चिम महाराष्ट्रात महावितरणने वीजचोरीविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. प्रादेशिक संचालक अंकुश नाळे हे विविध ठिकाणी भेटी देऊन वीजचोरीच्या घटनांची पाहणी करीत आहेत.