शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज साखर कारखाना चालवायला देण्यास स्थगिती?, आज निर्णय होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 11:53 IST

सभेत झालेल्या प्रचंड गदारोळातच कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देण्यास आवाजी मताने मंजुरी घेण्यात आली.

राम मगदूमगडहिंग्लज : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना चालवायला देण्यास उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.११जूनला झालेल्या विशेष सभेच्या ठरावाची प्रत हजर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी  दिले. आज, शुक्रवारी (१७) यासंदर्भात पुढील आदेश होण्याची शक्यता आहे.आर्थिक अडचणीमुळे साखर कारखाना व अर्कशाळा सहयोग/बीओटी/ भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय प्रशासक मंडळाने घेतला आहे.त्यासाठी आठवड्यापूर्वी विशेष सभा घेण्यात आली. सभेत झालेल्या प्रचंड गदारोळातच कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देण्यास आवाजी मताने मंजुरी घेण्यात आली.परंतु, त्याला विरोध असणाऱ्या सभासदांचे मत विचारात न घेतल्यामुळे संतप्त सभासदांनी प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अरुण काकडे यांना काही काळ घेराव घातला होता.दरम्यान, बाळगोंडा नाईक यांच्यासह चार सभासदांनी यासंदर्भात न्यायालयात दाद मागितली होती.कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे निवडणुकीनंतरच कारखाना चालवायला देण्याचा निर्णय घेतला जावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.गुरुवारी(१६) न्यायमूर्ती माधव जामदार व आर.डी.धनुका यांच्यासमोर सुनावणी झाली.अॅड.शैलेंद्र कानेटकर यांनी सभासदांची तर सरकारी वकील पी.जी.सावंत यांनी प्रशासकांची बाजू मांडली.

न्यायालयाचा आदेश असा

  • कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना प्रशासकांना असा धोरणात्मक निर्णय घेता येवू शकत नाही.
  • शुक्रवारी (१७)विशेष सभेतील ठरावाची प्रत न्यायालयात हजर करावी.
  • पुढील आदेशापर्यंत विशेष सभेतील ठरावाची अंमलबजावणी/ कार्यवाही करु नये.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने