छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दलची सात आक्षेपार्ह चित्रे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 05:21 IST2019-05-27T05:21:25+5:302019-05-27T05:21:31+5:30

राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये भरविण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनात छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दलची आक्षेपार्ह चित्रे लावण्यात आली होती.

In possession of seven offensive pictures about Chhatrapati ShivajiRaje | छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दलची सात आक्षेपार्ह चित्रे ताब्यात

छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दलची सात आक्षेपार्ह चित्रे ताब्यात

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये भरविण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनात छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दलची आक्षेपार्ह चित्रे लावण्यात आली होती. त्याची माहिती मिळताच संतप्त छत्रपती संभाजीराजेप्रेमींनी रविवारी रात्री प्रदर्शन बंद पाडत आक्षेपार्ह सात चित्रे ताब्यात घेतली. आक्षेपार्ह चित्राबद्दल संयोजिका स्मृती शिरसाट यांनी माफी मागितली.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या चित्रप्रदर्शनास महाराष्ट्रासह कुठेही परवानगी देऊ नये, अशा मागणीचे पत्र खा. संभाजीराजे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना ई मेलद्वारे रात्री उशिरा पाठविले.

Web Title: In possession of seven offensive pictures about Chhatrapati ShivajiRaje