गर्भकल्याणकमध्ये दिवसभर पूजा बाहुबली महामस्तकाभिषेक : पंचकल्याणकचा दुसरा दिवस; श्रवणबेळगोळमध्ये गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:37 IST2018-02-09T00:35:50+5:302018-02-09T00:37:49+5:30
कोल्हापूर/ बाहुबली : श्रवणबेळगोळ येथे सुरू असलेल्या गोमटेश्वर भगवान बाहुबली मूर्तीच्या ८८ व्या महामस्तकाभिषेक महोत्सवाच्या दुसºया दिवशी गुरुवारी गर्भकल्याणकसह विविध धार्मिक विधी पार पडले.

गर्भकल्याणकमध्ये दिवसभर पूजा बाहुबली महामस्तकाभिषेक : पंचकल्याणकचा दुसरा दिवस; श्रवणबेळगोळमध्ये गर्दी
कोल्हापूर/ बाहुबली : श्रवणबेळगोळ येथे सुरू असलेल्या गोमटेश्वर भगवान बाहुबली मूर्तीच्या ८८ व्या महामस्तकाभिषेक महोत्सवाच्या दुसºया दिवशी गुरुवारी गर्भकल्याणकसह विविध धार्मिक विधी पार पडले. त्यासाठी सवालधारकांनी दिवसभर पूजा केली. भट्टारक पट्टाचार्य चारूकीर्ती स्वामीजी, आचार्य श्री १०८ वर्धमानसागर महाराज, त्यागीगण, महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील यांच्यासह सर्व राष्टÑीय पदाधिकारी, आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहेत.
पंचकल्याणकचा कार्यक्रम संस्कार मंडप येथे सुरू आहे. याठिकाणी पूजेचा मुख्य मान मिळालेले (इंद्र-इंद्रायणी) भागचंद चुरीवाल व पत्नी सुनीता चुरीवाल (गुवाहाटी, आसाम) यांच्यासह गर्भकल्याणक विधीच्या सवालधारकांनी गुरुवारी पूजा केली. सकाळी नादीमंगल, जलकुंभ, नित्य पंचामृत अभिषेक, आदी कार्यक्रम झाले. तीर्थंकर मातेचे गोदभरण करण्यात आले. त्यानंतर वाद्यांच्या निनादाद भव्य मिरवणुकीने भद्र कुंभ संस्कार मंडप येथे आणण्यात आला. नंतर गर्भशुद्धीचा विधी झाला. त्यावेळी अष्टदिकन्या तीर्थंकरमातेची सेवा करत असल्याचा देखावा उभारण्यात आला होता. रात्री गर्भावतरण विधी झाला.
दरम्यान, महामस्तकाभिषेकासाठी श्रवणबेळगोळमध्ये देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. त्यांना निवास, भोजन यासह विविध सेवा मिळाव्यात यासाठी वीर सेवा दल, सन्मती संस्कार मंच, वीर महिला मंडळ, जैन संघटनांचे स्वयंसेवक काम करत आहेत. त्याचे सर्व नियोजन दक्षिण भारत जैन सभेचे सागर चौगुले, अरविंद मजलेकर, बाबा हुपरे, सेवा दलाचे पदाधिकारी करत आहेत.
तीर्थंकरमातेला सोळा स्वप्नांचा उलगडा
रात्री गर्भावतरण कार्यक्रमात तीर्थंकराच्या मातेला ऐरावत हत्ती, पांढरा बैल, सिंह, फुलांची माळ, लक्ष्मी, चंद्र, सूर्य, दोन कलश, माशांची जोडी, जलाशय, समुद्र, हिरेजडित सिंहासन, स्वर्गातील विमान, राजा नागेंद्रचे विमान, रत्नांच्या राशी, अग्नी ही सोळा स्वप्ने पडली. ही स्वप्ने फक्त तीर्थंकरमातेलाच पडतात, असे मानले जात असल्याने जैन धर्मामध्ये या स्वप्नांना अतिशय महत्त्व आहे. या स्वप्नातून तीर्थंकरमातेला आपला पुत्र भगवंत बनणार असून, तो भविष्यात मोक्षप्राप्ती करेल याचा उलगडा झाला. हे सर्व दाखविण्यासाठी पूजामंडपात प्रत्येक स्वप्नाची प्रतिकृती वाजत गाजत आणण्यात आली आणि या स्वप्नांचा अर्थ काय आहे, त्याचे महत्त्व विविध श्लोकांतून, मंत्रातून सांगण्यात आले.
श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वर भगवान बाहुबली मूर्तीच्या महामस्तकाभिषेक महोत्सवात गुरुवारी सकाळी इंद्र-इंद्रायणींनी मिरवणुकीने जलकुंभ आणला.