आठव्या माळेला पन्हाळ्यात अंबाबाईची दुर्गारुपात पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 19:47 IST2017-09-28T19:45:12+5:302017-09-28T19:47:00+5:30

शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त पन्हाळा येथील अंबाबाईच्या मूर्तीची गुरुवारी दुर्गारुपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. ही पूजा महेश जगदाळे, पृथ्वीराज भोसले, अमृत चरणकर यांनी बांधली.

Pooja of Ambabai's Durgaarupa in the eighth floor | आठव्या माळेला पन्हाळ्यात अंबाबाईची दुर्गारुपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त पन्हाळा येथील अंबाबाईच्या मूर्तीची गुरुवारी दुर्गारुपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. ही पूजा महेश जगदाळे, पृथ्वीराज भोसले, अमृत चरणकर यांनी बांधली.

ठळक मुद्देग्रामप्रदक्षिणेत ग्रामस्थ सहभागीप्रदक्षिणेत पन्हाळकर उत्साहाने सहभागी ग्रामप्रदक्षिणेनंतर आरती, जागर विविध कार्यक्रम

कोल्हापूर, दि. ८ : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त पन्हाळा येथील अंबाबाईच्या मूर्तीची गुरुवारी दुर्गारुपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. ही पूजा महेश जगदाळे, पृथ्वीराज भोसले, अमृत चरणकर यांनी बांधली.


पन्हाळा येथील देवी अंबाबाई सेवा मंडळामार्फत आठव्या माळेला सायंकाळी सहा वाजता वाजत-गाजत अंबाबाईच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा निघाली. ही पालखी अंबाबाई मंदिरातून निघून बसस्थानक, संभाजी महाराज देवालय, साधोबा दर्गाह, बाजीप्रभू पुतळा, सज्जा कोठी, नगरपालिका या मार्गावर निघाली. या प्रदक्षिणेत पन्हाळकर उत्साहाने सहभागी झाले होते.


अंबाबाई मंदिरात सकाळी अभिषेक, सायंकाळी ग्रामप्रदक्षिणेनंतर आरती, जागर असे विविध कार्यक्रम पार पडत आहेत. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले, सचिव भीमराव काशीद, रविंद्र धडेल, मिलिंद जगताप, संजीव भालेकर, नीळकंठ मोघे आदींनी या सोहळ्याचे आयोजन केले.

Web Title: Pooja of Ambabai's Durgaarupa in the eighth floor