पंचगंगा दूषित करणाऱ्यांच्या पाठीशी प्रदूषण नियंत्रण मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 04:04 PM2020-02-17T16:04:40+5:302020-02-17T16:06:16+5:30

  कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण करणाºया घटकांना म्हणजेच गुन्हा करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करीत ...

Pollution Control Board with the backbone of Panchganga contaminants | पंचगंगा दूषित करणाऱ्यांच्या पाठीशी प्रदूषण नियंत्रण मंडळ

पंचगंगा दूषित करणाऱ्यांच्या पाठीशी प्रदूषण नियंत्रण मंडळ

googlenewsNext
ठळक मुद्देपंचगंगा दूषित करणाऱ्यांच्या पाठीशी प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रजासत्ताक संस्थेचे आरोप पाण्याचे नमुने घेण्यासाठी आदेश द्या; विभागीय आयुक्तांना पत्र

 




कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण करणाºया घटकांना म्हणजेच गुन्हा करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करीत आहेत, तर आढावा बैठकीत बंद खोलीमध्ये नदी प्रदूषणमुक्त झाल्याचे भासविले जात असल्याचा आरोप प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी पुणे विभागीय आयुक्त तथा पंचगंगा नदी प्रदूषण देखरेख समितीचे अध्यक्षांना पाठविले आहे.
पंचगंगा नदीतील तेरवाड बंधाºयांत रसायनयुक्तदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत पावले. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी प्रजासत्ताक संस्थेचे देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे विभागीय आयुक्तांना निवेदन पाठवून आरोप केले आहेत. निवेदनात म्हटले की, महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी निव्वळ प्रदूषण उघड होऊ नये म्हणून पहाणी व नमुने तपासणी करत नाहीत तसेच पंचगंगा नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत २१ जानेवारी रोजी तक्रार पाठवली होती, पण कोणतीही कारवाई केली नाही. नदी प्रदूषण वाढून मासे मृत होत आहेत. कागदोपत्री बैठका, आदेश, अहवाल इत्यादी तयार करून पंचगंगा नदीचे प्रदूषण संपले आहे, नदी प्रदूषणमुक्त झाली आहे, कोणतेही सांडपाणी मिसळत नाही, असे भासवले जाते. पण प्रत्यक्षात नदीबाबत ज्यावेळी उच्च न्यायालयाने समिती नेमली, त्यावेळे एवढीच प्रदूषणाची तीव्रता आजही आहे, हे तेरवाड बंधाºयातील घटनेमुळे स्पष्ट झाले आहे. नदी प्रदूषण करणाºया घटकांना नेहमीच पाठीशी घालण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करत असल्याचा आरोपही देसाई यांनी पत्रातून केला आहे.
त्यामुळे उच्च न्यायालयाने सोपविलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडून पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी ‘एल ई एस सँपल’ घेऊन प्रदूषणाची तीव्रता तपासून ती कमी करण्याबाबत आदेश द्यावेत, असे पत्र विभागीय आयुक्तांना ‘प्रजासत्ताक’चे देसाई यांनी पाठवले आहे.
-------------
तानाजी

 

Web Title: Pollution Control Board with the backbone of Panchganga contaminants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.