कुरुंदवाड : पंचगंगा नदी पात्रात दूषित पाणी आल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी बुधवारी सायंकाळी तेरवाड बंधारा येथे भेट देऊन पाहणी केली. तसेच पाण्याचे नमुने घेतले.दरम्यान दूषित पाण्याचे नमुने घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आल्याचे समजताच स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांनी बंधाऱ्यावर येऊन अधिकारी पाटील यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत कारखानदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. यावेळी अधिकारी पाटील यांनी दूषित पाण्याचे नमुने घेतले असून त्याचा अहवाल येताच दोषींवर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांना अहवाल देण्यात येईल. तसेच नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
Web Summary : Following reports of polluted Panchganga river water, pollution control officials collected samples. 'Swabhimani' leader confronted the official, alleging factory protection. The official promised action after the report and investigation.
Web Summary : पंचगंगा नदी में दूषित पानी की खबरों के बाद, प्रदूषण नियंत्रण अधिकारियों ने नमूने लिए। 'स्वाभिमानी' नेता ने अधिकारी का सामना किया, कारखानों को बचाने का आरोप लगाया। अधिकारी ने रिपोर्ट और जांच के बाद कार्रवाई का वादा किया।