शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Gram Panchayat Election: कोल्हापुरात सोमवारपासून रणधुमाळी; १९७७ केंद्रांवर होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 12:38 IST

जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान आणि २० डिसेंबरला मतमोजणी होणार

कोल्हापूर : जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १ हजार ९७७ केंद्रांवर मतदान होणार असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे की नाही हे पाहण्यासाठी जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी संवर्गातील ९ अधिकाऱ्यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदानासाठी अपेक्षित बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तसा प्रशासनाच्या तयारीलाही वेग आला आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार (दि.२८)पासून सुरू होत आहे.जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान आणि २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी एकीकडे उमेदवारांची घाई सुरू असली तरी दुसरीकडे ही प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी असलेले जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत विभागातही प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनातील ९ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे (शाहूवाडी), विवेक काळे (चंदगड), उपविभागीय अधिकारी करवीर वैभव नावडकर (करवीर, गगनबावडा) सुशांतकिरण बनसोडे (राधानगरी, कागल), वसुंधरा बारवे (भुदरगड, आजरा), बाबासाहेब वाघमोडे (गडहिंग्लज), भैरप्पा माळी (पन्हाळा), विकास खरात (इचलकरंजी), जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे (शिरोळ) हे अधिकारी निरीक्षक म्हणून काम पाहतील.मतदानासाठी लागणारे बॅलेट युनिट व कंट्रोल युनिक पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने ते मागविण्याची गरज नाही; पण निवडणुकीसाठी लागणाऱ्या पांढऱ्या मेमरी, मार्कर पेन, पेपरसील, पट्टीसील, स्पेशन टॅग या साहित्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली आहे.

 

  • ग्रामपंचायतींची संख्या : ४७२
  • प्रभाग संख्या : १ हजार ६५०
  • सदस्य संख्या : ४ हजार ४०२
  • सरपंच : ४७४
  • मतदानासाठी लागणारे बॅलेट युनिट : २ हजार ५७०
  • मतदानासाठी लागणारे कंट्रोल युनिट : २ हजार २७५
टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक