कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 18:13 IST2019-02-23T18:06:14+5:302019-02-23T18:13:48+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी उद्या, रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे. मतमोजणी सोमवारी (दि. २५) सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे.

Polling for five Gram Panchayats in Kolhapur district tomorrow | कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदानमतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून

कोल्हापूर : जिल्ह्यातील पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी उद्या, रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे. मतमोजणी सोमवारी (दि. २५) सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे.

शाहूवाडी तालुक्यातील चांदोली, घोळसवडे, आलतूर, पुसार्ले, भेंडवडे व पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. यासाठी पाच हजार ३६३ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.

या गावातील शासकीय कर्मचारी तसेच कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी किंवा मतदानासाठी तीन तासांची सवलत द्यावी, असे आदेश निवडणूक विभागाकडून संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.

मतमोजणी सोमवारी (दि. २५) सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील मतमोजणी शाहूवाडी तहसीलदार कार्यालय व पन्हाळा तालुक्यातील मतमोजणी पन्हाळा तहसीलदार कार्यालय येथे होईल.

 

 

Web Title: Polling for five Gram Panchayats in Kolhapur district tomorrow