शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: प्रभाग रचना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव, काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:59 IST

प्रभाग रचनेचे काम दबावाखाली नको

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रारूप प्रभाग रचना करत असताना कोणाच्याही राजकीय दबावाखाली करू नका, अशा मागणीचे निवेदन बुधवारी कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या माजी नगरसेवकांनी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना दिले.काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी प्रशासक मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली, त्यावेळी शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी निवडणुकीसाठी प्रभाग रचना करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा थेट आरोप केला. कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जर असे कोणाच्या दबावाखाली प्रभाग रचना केली जाणार असेल, तर ती आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.प्रभाग रचना कोणत्याही राजकीय दबावाखाली होऊ नये. तसेच प्रभाग रचनेत पारदर्शकता असावी, अशी आमची मागणी आहे. परंतु आमच्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत. काँग्रेसच्या काही विशिष्ट माजी नगरसेवकांचे प्रभाग फोडताना दुजाभाव करून ते कसे अडचणीत येतील यादृष्टीने अधिकाऱ्यांवर दबाव आणले जात आहेत. प्रशासक म्हणून आपणही ते खपवून घेऊ नये, असे चव्हाण यांनी सांगितले.

शिष्टमंडळात सचिन चव्हाण, भूपाल शेटे, संजय मोहिते, जय पटकारे, श्रावण फडतारे, शोभा कवाळे, प्रतापसिंह जाधव, इंद्रजित बोंद्रे या नगरसेवकांसह दुर्वास कदम, शिवानंद बनसोडे, संजय लाड, दिग्विजय मगदूम, अभिजित देठे, फिरोज सौदागर, उमेश पोवार, रियाज सुभेदार यांचा समावेश होता.

फायरमनना कायम सेवेत सामावून घ्यामहानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाकडे मानधनावर काम करणाऱ्या फायरमन यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. आकृतिबंधानुसार फायरमनची १३० पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात कायम १५ व ठोक मानधनावरील ४३ फायरमन सेवेत आहेत. ७२ पदे रिक्त आहेत. म्हणूनच जे फायरमन ठोक मानधनावर काम करीत आहेत, त्यांना सेवेत कायम करावे, असे निवेदनात म्हटले आहे.