गेळवडेत राजकीय वादातून मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:58 IST2018-11-12T00:58:14+5:302018-11-12T00:58:19+5:30

मलकापूर/कोल्हापूर : गेळवडे (ता. शाहूवाडी) येथे ग्रामपंचायत निवडणूक वादातून शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्ष यांच्या गटात रविवारी सकाळी जोरदार ...

Political debates in Galvesta | गेळवडेत राजकीय वादातून मारामारी

गेळवडेत राजकीय वादातून मारामारी

मलकापूर/कोल्हापूर : गेळवडे (ता. शाहूवाडी) येथे ग्रामपंचायत निवडणूक वादातून शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्ष यांच्या गटात रविवारी सकाळी जोरदार मारामारी झाली. यावेळी दोन्ही बाजूंनी तलवार, काठ्या, दगड, दांडक्याने केलेल्या हल्ल्यात आठजण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या मारामारीमुळे गावात तणाव पसरला असून, सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये सीताराम ऊर्फ बाबू सखाराम लाड (वय ४८) यांचा हात तुटल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे.
अधिक माहिती अशी, गेळवडे येथील ग्रामपंचायत निवडणूक काही महिन्यांपूर्वी झाली आहे. त्यापासून येथील दोन राजकीय गटांत सतत वादावादीचे प्रकार घडत आहेत.
तीन दिवसांपूर्वी सीताराम लाड
यांच्या मामाच्या मुलाला मारहाण केली होती.
तसेच त्यांच्या पाळीव कुत्र्यालाही मारहाण झाली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी मुंबईहून सीताराम लाड व त्यांचे कार्यकर्ते विरोधी गटाचे तानाजी पाटील व बाळकू पाटील यांच्याकडे रविवारी सकाळी गेले. यावेळी लाड आणि पाटील गटांत जोरदार राडा झाला. तानाजी पाटील, शरद पाटील, बाळकू पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी तलवारीने सीताराम लाड यांच्यावर वार केला. त्यामध्ये लाड यांचा हात तुटून ते गंभीर जखमी झाले; तर आठजण जखमी झाले. दोन गटांत राडा झाल्याने गावात तणाव निर्माण झाला. जखमींना तत्काळ ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. घटनेची माहिती समजताच शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. गावात रात्री उशिरापर्यंत सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी सीपीआर रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत शाहूवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Political debates in Galvesta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.