शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात बदलीसाठी पोलिसाने पोलिसाकडूनच उकळली खंडणी; हेडक्लार्क अटकेत, महिलेवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 13:01 IST

पोलिस दलात खळबळ उडाली

कोल्हापूर : आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या पोलिस कॉन्स्टेबलकडून ३० हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील हेडक्लार्क आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील महिला पोलिस कर्मचाऱ्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हेडक्लार्क संतोष मारुती पानकर (वय ४५, रा. हनुमान गल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक केली. पानकर याच्यासह धनश्री उदय जगताप (रा. कसबा बावडा) हिच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षकांनी मंजूर केलेल्या बदली अर्जाची प्रक्रिया राबविण्यासाठी हेडक्लार्कनेच खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.पोलिस कॉन्स्टेबल रितेश मनोहर ढहाळे (वय ३१, सध्या रा. कोल्हापूर, मूळ रा. वसाळी, जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची २० जुलै २०२५ रोजी चंदगड पोलिस ठाण्यात बदली झाली होती. गावाकडे वडील आजारी असल्याने त्यांनी नाशिक जिल्ह्यात बदली मिळावी, असा अर्ज पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्याकडे केला होता. अधीक्षकांनी अर्ज मंजूर करून तो पुढील कार्यवाहीसाठी हेडक्लार्क पानकर याच्याकडे पाठवला. पानकर याने कॉन्स्टेबल धनश्री जगताप हिच्याकरवी ढहाळे यांना निरोप पाठवला. बदलीसाठी ३० हजार रुपये द्यावे लागतील. अन्यथा बदली होणार नाही, अशी भीती त्याने घातली. त्यानंतर बुधवारी (दि. २३) सायंकाळी जगताप हिच्या बँक खात्यात ऑनलाईन ३० हजार रुपये स्वीकारले. जगताप हिने यातील २० हजार रुपये पुढे पानकर याच्या खात्यावर पाठवले.

खंडणीचा गुन्हाबदलीसाठी हेडक्लार्कनेच पैसे स्वीकारल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षकांनी पानकर याला कार्यालयात बोलवून घेतले. त्याची कानउघडणी करून शाहूपुरी पोलिसांना त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी शुक्रवारी (दि. २५) मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास गुन्हा दाखल करून पानकर याच्यावर अटकेची कारवाई केली. जगताप हिला अटक होण्याची शक्यता आहे.