पासपोर्टसाठीची पोलीस पडताळणी आता सुलभ, सुधारित आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 16:03 IST2019-02-05T15:57:40+5:302019-02-05T16:03:33+5:30
पासपोर्ट मिळवण्यासाठीची पोलीस पडताळणी प्रक्रिया आता सुलभ झाली आहे. केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने १५ जानेवारी २0१९ रोजी याबाबत सुधारित आदेश काढले आहेत.

पासपोर्टसाठीची पोलीस पडताळणी आता सुलभ, सुधारित आदेश
कोल्हापूर : पासपोर्ट मिळवण्यासाठीची पोलीस पडताळणी प्रक्रिया आता सुलभ झाली आहे. केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने १५ जानेवारी २0१९ रोजी याबाबत सुधारित आदेश काढले आहेत.
पासपोर्टच्या अर्जाची पडताळणी करताना पोलिसांनी केवळ अर्जदाराचे नागरिक त्व आणि गुन्हेगारी नोंद याची शहानिशा करणे अपेक्षित आहे. अर्जदाराची ओळख पटवणे, त्याचा पत्ता प्रत्यक्ष तपासणे हे काम पोलिसांनी करणे अपेक्षित नाही. पोलिसांना अगदीच गरज भासली तर अर्जदाराच्या घरी भेट देणे किंवा अर्जदाराला पोलीस स्टेशनला बोलवणे अपेक्षित आहे.
त्यामुळे अर्जदारांनी पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये कागदपत्रे देताना व फॉर्म भरताना अचूकपणे भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जदाराचे ओळखपत्र, रहिवासी पत्ता या कागदपत्रांची तपासणी पासपोर्ट कार्यालयाद्वारे तपासली जाणार आहेत. तेव्हा कागदपत्रे नीट भरावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
२१ दिवसात ८३ टक्के अर्जांची निर्गत
पोलीस ठाण्यात ७ दिवसांत १४ दिवसांत २१ दिवसांत १ महिन्यात १ महिन्यावरील
आलेली प्रकरणे निर्गत निर्गत निर्गत निर्गत निर्गत
३१६७६ ५४९५ १४२0१ ६६४१ ३२२४ २११५
टक्केवारी १७ ४५ २१ १0 ७
८३ टक्के १७ टक्के