शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अश्विनी बिद्रे हत्येचा सूत्रधार अभय कुरुंदकर अजूनही पोलिसांचा जावई; राजू गोरे यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 19:06 IST

कुरुंदकरचा पॅरोल अर्ज देण्यास पोलिसांचा नकार

कोल्हापूर : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या खुनाचा मुख्य सूत्रधार आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला गुन्हेगार बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर अजूनही पोलिस खात्याचा जावई आहे काय? असा संतप्त सवाल अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी उपस्थित केला आहे.कुरुंदकर याने तुरुंगातून अर्जित रजा (पॅरोल) मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची प्रत देण्यास राजारामपुरी पोलिसांनी नकार दिल्याने गोरे यांनी मंगळवारी (दि. १०) संताप व्यक्त केला. तसेच, कुरुंदकरला पॅरोल मिळण्यास विरोध दर्शवला.बडतर्फ पोलिस निरीक्षक कुरुंदकर हा अश्विनी यांच्या खूनप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. २० जून रोजी कोल्हापुरात त्याच्या मुलाचे लग्न होणार आहे. त्यासाठी अर्जित रजा मिळावी, अशी विनंती त्याने कारागृह प्रशासनाकडे केली आहे. त्यानुसार कारागृह प्रशासनाने राजारामपुरी पोलिसांना पत्र पाठवून लग्न कुठे आहे?, कधी आहे? याचे तपशील मागवले आहेत. तसेच, त्या गुन्ह्यातील फिर्यादी राजू गोरे यांचा जबाब घेऊन पाठवण्याची विनंती केली आहे.

कुरुंदकर तुमचा शत्रु, आमचा नाहीराजारामपुरी पोलिसांनी राजू गोरे यांना जबाब नोंदवण्यासाठी मंगळवारी बोलवले होते. त्यांनी जबाब देण्यापूर्वी कुरुंदकर याच्या अर्जाची प्रत मागितली. मात्र, पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी प्रत देण्यास नकार दिला. कुरुंदकर हा तुमचा शत्रू असेल. आमचा शत्रू नाही, असे सुनावले. यावर गोरे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेत संताप व्यक्त केला.यापूर्वी मुंबई पोलिसांनी वारंवार आरोपी कुरुंदकर आणि त्याच्या सहकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही पोलिस त्याला मदत करण्यासाठी धडपडत आहेत. त्याचा अर्ज लपवत आहेत, असा आरोप गोरे यांनी केला.

सुपेकरांशी लागेबांधे?वरिष्ठ पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर आणि कुरुंदकर कुटुंबीय एकमेकांच्या संपर्कात होते. कारागृह विभागाची जबाबदारी सांभाळताना गुन्हेगार अभय कुरुंदकर आणि त्याच्या पोलिस अधिकारी भावाशी सुपेकरांचा संपर्क आला असावा. कुरुंदकरच्या रजेच्या अर्जात सुपेकरांचा सहभाग असावा, अशी शक्यता गोरे यांनी व्यक्त केली.

कुरुंदकर कुटुंबाकडून धोकागुन्हेगार अभय कुरुंदकर याचा जावई पोलिस उपअधीक्षक आहे. कुरुंदकरच्या मुलीने पनवेल न्यायालयाच्या आवारात धमकावले होते. त्यामुळे या कुटुंबाकडून बिद्रे-गोरे कुटुंबाला धोका असल्याची तक्रार राजू गोरे यांनी केली आहे.