नेसरी ""अंनिस""तर्फे पोलिसांचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:03+5:302020-12-24T04:21:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नेसरी : करणी काढतो व गुप्त खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने येथील महिलेवर जादुटोणा व अत्याचार करणाऱ्या ...

नेसरी ""अंनिस""तर्फे पोलिसांचे कौतुक
लोकमत न्यूज नेटवर्क
नेसरी : करणी काढतो व गुप्त खजिना मिळवून देण्याच्या बहाण्याने येथील महिलेवर जादुटोणा व अत्याचार करणाऱ्या सिरसंगी (ता. आजरा) येथील भोंदुबाबा बाळूमामा तथा बाळू दळवी याला नेसरी पोलिसांनी अटक करून त्याच्या कारनाम्याचा पर्दाफाश केला. त्याबद्दल येथील नेसरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्याकडे अभिनंदनपर पत्र देऊन नेसरी पोलीस ठाण्याचा गौरव करण्यात आला. अभिनंदन पत्रात संशयित भोंदुबाबा बाळू दळवी याच्यावर सुरू असलेल्या कारवाईचे नेसरी ''''अंनिस''''ने कौतुक केले आहे. त्याच्या या भोंदुगिरीचा व अत्याचाराचा छडा पोलिसांनी तत्काळ लावावा, त्याला जामिनावरू सोडू नये, अशी विनंती केली आहे. यावेळी नेसरी शाखाध्यक्ष एस. एन. देसाई, पी. एल. करंबळकर, माजी प्राचार्य एस. एस. मटकर, माजी सरपंच वसंतराव पाटील, प्रा. एस. बी. चौगुले, प्रल्हाद माने, विजय गुरबे, अमोल बगडी, टी. बी. कांबळे आदी उपस्थित होते.
-------------------------
फोटो ओळी : सिरसंगी (ता. आजरा) येथील भोंदुबाबा बाळूमामा तथा बाळू दळवी याला अटक केल्याबद्दल सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांचे अभिनंदन करताना एस. एन. देसाई, पी. एल. करंबळकर, एस. एस. मटकर, वसंतराव पाटील, प्रा. एस. बी. चौगुले, प्रल्हाद माने, विजय गुरबे, अमोल बागडी, टी. बी. कांबळे आदी उपस्थित होते.
क्रमांक : २३१२२०२०-गड-०२