पोलिस, पद्मा पथक, देवगिरी, महाराष्ट्र उपांत्य फेरीत

By Admin | Updated: April 27, 2017 00:12 IST2017-04-27T00:12:28+5:302017-04-27T00:12:28+5:30

प्रा. शिवाजीराव घोरपडे स्मृतिचषक हॉकी स्पर्धा, आज उपांत्य फेरीसह अंतिम सामना

Police, Padma Pathak, Devgiri, Maharashtra in semifinals | पोलिस, पद्मा पथक, देवगिरी, महाराष्ट्र उपांत्य फेरीत

पोलिस, पद्मा पथक, देवगिरी, महाराष्ट्र उपांत्य फेरीत

कोल्हापूर : उत्कृष्ट मित्रमंडळातर्फे आयोजित प्रा.कै. शिवाजीराव घोरपडे स्मृतिचषक वरिष्ठ हॉकी स्पर्धेत बुधवारी कोल्हापूर पोलिस, पद्मा पथक, देवगिरी फायटर्स, महाराष्ट्र क्रीडा मंडळाने प्रतिस्पर्धी संघांवर मात करत उपांत्य फेरी गाठली.
पहिल्या सामन्यात कोल्हापूर पोलिस संघाने पोलिस बॉईज संघाचा ३-२ असा पराभव केला. त्यात पोलिस संघाकडून विक्रांत पाटील, सत्यजित सावंत, संदीप सावंत यांनी; तर पोलिस बॉईजकडून प्रकाश पाटील, दत्ता पाटील यांनी गोल नोंदविले.
दुसऱ्या सामन्यात देवगिरी फायटर्सने शाम स्पोर्टस्चा टायब्रेकरवर ४-३ गोलने पराभव केला.
तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्र क्रीडा मंडळाने चुरशीच्या सामन्यात हनुमान ब्लेसिंग संघाचा १-० असा सडनडेथवर पराभव केला.
चौथ्या सामन्यात पद्मा पथक संघाने छावा मित्रमंडळाचा ३-० असा पराभव केला. त्यात पद्मा पथकाकडून निरंजन जाधव, आकाश शिंदे, मासूम सय्यद यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद केली.
चारही विजेते संघ उपांत्य फेरीत पोहोचले. सकाळच्या सत्रात उपांत्य फेरीचे, तर दुपारी अंतिम सामना होणार आहे.

Web Title: Police, Padma Pathak, Devgiri, Maharashtra in semifinals