शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लाचखोरीत पोलिसांनी ‘महसूल’लाही टाकले पिछाडीवर, सर्वाधिक कारवाई जानेवारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 12:41 IST

पाच महिन्यात तब्बल ११ जणावर लाचेच्या कारवाई झाल्या असल्या तरीही फक्त एकाच लाचखोराची संपत्ती गोठविण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे.

तानाजी पोवारकोल्हापूर : सरकारी कर्मचाऱ्यांची लाचखोरी नेहमीच जोमात असते. अक्षरश: सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणारेही लाच घेण्यात अग्रेसर असल्याचे कारवाईवरून स्पष्ट होते. कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी लाचखोरीत महसूल विभागाचा अव्वल नंबर लागतो. पण २०२२ या वर्षात पहिल्या पाच महिन्यातील कारवाईवरून महसूल विभाग मागे पडून तोच अव्वल नंबर लाचखोर पोलिसांनी पटकवल्याचे दिसून येत आहे.पाच महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विविध विभागात लाचविरोधात एकूण ११ कारवाई केल्या. त्यामध्ये सहा पोलीस चार ठिकाणी झालेल्या कारवाईत ‘ट्रॅप’ झाले. आतापर्यत हजारापासून १० लाखापर्यत लाच घेतल्याची उदाहरणे आहेत.

लाचखोरीत पोलीस नंबर वनजिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच पहिल्या पाच महिन्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. ‘एलसीबी’च्या दोघांना लाचखोरीच्या प्रकरणात ‘ट्रॅप’ करून वर्षारंभ झाला. त्यानंतर पाच महिन्यात सर्व विभागात एकूण ११ सापळे रचून कारवाई केली. त्यामध्ये एलसीबी, लक्ष्मीपुरी, गावभाग (इचलकरंजी) आदी चार ठिकाणच्या कारवाईत तब्बल ६ पोलीस गजाआड डांबले. त्यानंतर महसूल, आरोग्य, ग्रामविकास या विभागात प्रत्येकी दोन लाचेच्या कारवाई केल्या.

लाचखोरीच्या कारवाई

पोलीस : ०४महसूल : ०२आरोग्य : ०२ग्रामविकास : ०२वीज मंडळ : ०१

लाचखोरीचा विळखावर्षे : एकूण कारवाई संख्या२०१९ : २६२०२० : २७२०२१ : २४मे २०२२ पर्यत : ११

सर्वाधिक सापळे जानेवारीत

जिल्ह्यात सर्वाधिक ०३ इतके ‘लाचलुचपत’ विभागाचे सापळे हे जानेवारी महिन्यात लावले, ते सर्व यशस्वीही झाले. चालू वर्षातील पाच महिन्यात एकूण ११ कारवाई झाल्या असल्या तरीही गतवर्षी याच कालावधीतपर्यत फक्त सात कारवाई झाल्या होत्या.

फक्त एकाचीच गोठवली मालमत्तापाच महिन्यात तब्बल ११ जणावर लाचेच्या कारवाई झाल्या असल्या तरीही फक्त एकाच लाचखोराची संपत्ती गोठविण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे.

१६ जण अटक

तब्बल ११ कारवाईत एकूण १६ लाचखोरांना गजाआड डांबता आले. यामध्ये सहा पोलिसांचा समावेश आहे.

लाचखोरी ही समाजाला लागलेली कीड आहे, याविरोधात पाऊल उचलण्यासाठी तक्रारदारांनी तक्रारी करण्यासाठी पुढे यावे. टोल फ्री नं. १०६४ ला फोन करा, तक्रारदार ज्या ठिकाणी असेल तेथे ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागा’चा कर्मचारी पोहचून तक्रार घेईल. सापळा रचून लाचखोरांना गजाआडची हवा दाखवा. - आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण