शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पोलिसांना आव्हान देत रस्त्यावर वाढदिवस केला, जर्मनी गँगच्या सहा जणांना पोलिसांनी चोप दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 18:07 IST

इचलकरंजी : सोशल मीडियावरून पोलिसांना आव्हान देत जुना सांगली नाका चौकातील रस्त्यावर केक कापून वाढदिवस करणाऱ्या जर्मनी गँगसह मोक्कातील ...

इचलकरंजी : सोशल मीडियावरून पोलिसांना आव्हान देत जुना सांगली नाका चौकातील रस्त्यावर केक कापून वाढदिवस करणाऱ्या जर्मनी गँगसह मोक्कातील सहा संशयित गुन्हेगारांना पोलिसांनी तपासासाठी शहरात फिरवले. साईनगर, यशवंत प्रोसेसर्स, जुना नाका चौक परिसरातील रस्त्यावर फिरवताना संशियतानी सार्वजनिक ठिकाणी पुन्हा दहशत करणार नाही, अशी हात जोडून माफी मागितली.शाहरूख जमादार (वय २६, रा. जवाहर नगर), वैभव कोरवी (२३, रा. कोरवी गल्ली), अविनाश जाधव ऊर्फ जर्मनी (३१, रा. हनुमाननगर जवाहर नगर), सूरज वाडकर (२६, रा. लिंबू चौक), गौरव मरडे (२७, रा. आय. जी. एम. परिसर), ओंकार धातुंडे (२२, रा. जुना सांगली नाका चौक) अशी त्यांची नावे आहेत.जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाचा भंग करत जर्मनी गँगमधील रूपेश पंडित नरवाडे याचा वाढदिवस डॉल्बीच्या दणदणाटात दहशत माजवत साजरा केला. याबाबत शिवाजीनगर व गावभाग पोलिसांत सुमारे ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना आव्हान देत दहशत माजवत वाढदिवस साजरा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. याची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी तपास करून सहा संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांना गुरुवारी रात्री आठ वाजल्यानंतर तपासासाठी घटनास्थळी फिरवले. सुरुवातीला यशवंत प्रोसेसर्सपासून शाहू पुतळा मार्गावर फिरवण्यात आले. त्यानंतर साई मंदिर परिसर, मराठा चौक भागातून फिरवत चौकशी केली. पुढे त्यांना जुना सांगली नाका चौक परिसरातील शांती निकेतन शाळेसमोरील रस्त्यावर आणण्यात आले. याठिकाणी गुन्हेगारांनी हात जोडून माफी मागितली. यावेळी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. यातील रूपेश नरवाडे हा अद्याप पोलिसांना सापडला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस