शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: चोरांच्या नाना तऱ्हा... कोणी नोटा परत ठेवतो, कोणी जेवून जातो; पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:34 IST

आचंबित होण्याइतका सराईतपणा; डीव्हीआरसह पुरावेही गायब, करुन जातात घाण

कोल्हापूर : घरात सर्वांचा डोळा चुकवून धान्यांच्या डब्यात लपवून ठेवलेली रोकड असो, की कुलूपबंद अवजड तिजोरी असो. चोरट्यांना नेमकी जागा सापडते आणि काही क्षणात लाखोंचा किमती ऐवज लंपास होतो. चोरीचे दुष्कृत्य करतानाही काही चोरटे त्यांची वेगळी छाप सोडतात. त्यामुळे चोरट्यांच्या नाना तऱ्हांची चर्चा घरमालकांसह पोलिसांमध्येही रंगते.चार दिवसांपूर्वी पाचगाव परिसरात झालेल्या तीन घरफोड्यांमध्ये चोरट्याने एकही चांदीचा दागिना किंवा चांदीच्या वस्तूंना हात लावला नाही. चांदीचे कॉइन आणि सुट्टे पैसेही त्याने चोरले नाहीत. रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांवरच त्याने डल्ला मारला. विशेष म्हणजे तिन्ही ठिकाणी त्याने रोकडमधील दहा रुपयांची एक नोट काढून परत ठेवली.तिन्ही ठिकाणी देव्हाऱ्यावरील वस्तूंना, मूर्तींना धक्का लावला नाही. हॉलमध्ये चपला काढून तो देव्हाऱ्याकडे गेल्याचे पाऊल खुणांवरून दिसत आहे. कपाटांमधील साहित्यही फारसे विस्कटले नाही. शिवाय परत जाताना दरवाजे पूर्ववत बंद केले. फक्त सोने आणि रोकड चोरणाऱ्या चोरट्याला चांदीचा मोह झाला नसल्याने याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

डीव्हीआरसह पुरावेही गायबअनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात. मात्र, त्याचा डीव्हीआर घरात दर्शनी भागातच असतो. अनेक चोरटे चोरी करून जाताना डीव्हीआर घेऊन जातात. काहीजण कॅमेऱ्यांवर रुमाल टाकतात. काही चोरटे मास्क घालून ओळख लपवतात.

हाताला लागेल ते लंपासकाही चोरटे हाताला लागेल ते लंपास करतात. पेठ वडगाव येथील कोल्हापूर रोडवर एका बंद हॉटेलमधील टीव्ही संच, गिझर, जनरेटर, गाद्या, झेरॉक्स मशीन अशा अनेक वस्तू टेम्पो भरून पळविल्या. ग्रामीण भागात दारातील भांडी, कपडे पळविणाऱ्या टोळ्या सक्रिय असतात.

चोरीसह पोटपूजाहीकाही चोरांना चोरीसोबतच पोटपूजा करण्याचा मोह आवरत नाही. स्वयंपाक घरातील डबे, फ्रीज उघडून चपाती-भाजी खाऊन चोरट्यांनी घरातील किमती ऐवजावर डल्ला मारल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. हाताला काहीच न लागल्यास साहित्य विस्कटून किंवा घरातील वस्तूंचे नुकसान करून पळणारेही चोरटे अनेक ठिकाणी दिसतात.

घरात घाण करून जातातकाही चोरटे चोरी केल्यानंतर त्याच घरात लघुशंका किंवा शौच करतात. श्वान पथकाची दिशाभूल करण्यासाठी असे प्रकार केले जातात. पोलिसांना कोणताही सुगावा सापडू नये यासाठी चोरांकडून हॅण्डग्लोज, मास्क वापरण्याचे प्रमाण वाढल्याचे पोलिस सांगतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Crimes: Thieves' Strange Ways Baffle Police; Notes Returned, Meals Eaten

Web Summary : Kolhapur police are puzzled by unique theft styles. Some thieves only take cash and gold, leaving silver and returning notes. Others eat food during the crime, and some even defecate to mislead trackers. DVRs are often stolen to erase evidence.