शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 20:11 IST

Maratha Reservation Kolhapur : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घेण्यात चालढकल केली जात असल्याच्या निषेधार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा, तसेच बैठक उधळून लावण्याचा इशारा दिल्यामुळे पोलिसांनी सोमवारी मराठा समाजातील ३० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या जिजाऊ फाउंडेशनच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात थोडी झटापट झाली.

ठळक मुद्देमराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यातकार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट

कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घेण्यात चालढकल केली जात असल्याच्या निषेधार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा, तसेच बैठक उधळून लावण्याचा इशारा दिल्यामुळे पोलिसांनी सोमवारी मराठा समाजातील ३० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या जिजाऊ फाउंडेशनच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात थोडी झटापट झाली.यूपीएससी व एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी सचिन तोडकर, दिलीप पाटील, स्वप्निल पार्टे यांनी केली आहे. परंतु राज्य सरकारने त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. म्हणून त्याचा निषेध तसेच या प्रश्नाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा इशारा दिला होता. रविवारी त्यांना पोलिसांनी आंदोलन करता येणार नाही, अशी नोटीस बजावली होती.सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून कार्यकर्ते तेथे जमायला लागताच पोलिसांनी जादा कुुमक मागवून घेतली. साडेदहा वाजता तोडकर, पाटील, पार्टे यांच्यासह नितीन देसाई, संजय जमदाडे, भास्कर पाटील, पंकज कडवकर, धनश्री तोडकर आदी तीस ते पस्तीस कार्यकर्ते बाहेर पडत असताना पोलिसांनी त्यांना अडविले. या वेळी वादावादी, झटापट झाली. शेवटी सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नेले. दुपारी दोन वाजता अजित पवार कोल्हापुरातून बाहेर पडल्यानंतर सर्वांना सोडून देण्यात आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर