कोल्हापूर : सोशल मीडियावर अश्लील रिल्स बनविणाऱ्या इचलकरंजीच्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दणका दिला आहे. या तरुणांना समज दिली. त्यांनी अशा प्रकारचे रिल्स कधीही बनविणार नसल्याची कबुली पोलिसांसमोर देऊन तसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.विशाल बनगोडी, निवृत्ती परीट ऊर्फ नारु आणि बालाजी डांगे (सर्व रा. इचलकरंजी) अशी त्याची नावे आहेत. या तिघांनी अश्लील भाषेत केलेला व्हिडिओ व्हायरल केला. त्यासंदर्भात अनेकांनी कमेंटमधून आक्षेप नोंदविले. विशल्या, नारू, बाल्या या नावाने या तीन तरुणांची सोशल मीडियावर ओळख आहे. त्यांनी बनविलेल्या रिल्सची एलसीबीने गांभीर्याने दखल केली. त्यांना गुरुवारी कार्यालयात बोलावून त्यांची कानउघाडणी केली. अशा प्रकारचे रिल्स पुन्हा कधी बनविणार नाही, अशी कबुली घेऊन व्हिडीओ व्हायरल केला.
Kolhapur Crime: अश्लील रिल्स बनविणे तरुणांना भोवले; पोलिसांनी दिली समज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 13:15 IST