शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

जोंकमारी वनस्पतीमुळे जनावरांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:01 IST

पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिकेत आढळणारी जोंकमारी ही विषारी वनस्पती महाराष्ट्रातही आढळली आहे. चाऱ्यातून ही वनस्पती पोटात गेल्यास जनावरे दगावतात. औरंगाबादमध्ये गेल्या महिन्यात ही वनस्पती खाल्ल्याने अशाच प्रकारच्या विषबाधेचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक जागरुक राहावे, असे आवाहन वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देजोंकमारी वनस्पतीमुळे जनावरांना विषबाधावनस्पतीतज्ज्ञ डॉ. बाचूळकर यांंची माहिती: औरंगाबादमध्ये जनावरांचा मृत्यू

कोल्हापूर : पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिकेत आढळणारी जोंकमारी ही विषारी वनस्पती महाराष्ट्रातही आढळली आहे. चाऱ्यातून ही वनस्पती पोटात गेल्यास जनावरे दगावतात. औरंगाबादमध्ये गेल्या महिन्यात ही वनस्पती खाल्ल्याने अशाच प्रकारच्या विषबाधेचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक जागरुक राहावे, असे आवाहन वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केले आहे.राज्यातील अहमदनगर, अकोला, चंद्रपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, पुणे, रायगड, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये या वनस्पती आढळतात. ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती आहे. फांद्या चौकोनी व गुळगुळीत असतात. फुले निळ्या रंगाची असून, पानांच्या बेचक्यातून लांब देठावर ती एकांडी येतात. याच्या बियादेखील कोंबड्या व पक्ष्यांसाठी विषारीच आहेत.

असेही फायदेही वनस्पती विषारी असल्याचे जसे तोटे आहेत, तसे काही फायदेही आहेत. यात कीटकनाशक गुणधर्म असल्याने मासे व जळवा मारण्यासाठी याचा उपयोग होतो. पिसाळलेल्या कुत्र्याच्या व कोल्ह्याच्या विषारात याच्या पानाचा रस ठरावीक प्रमाणात देतात अथवा दंशावर लेप करतात. अंगात रुतलेले काटे काढण्यास व व्रण भरून येण्यासदेखील या वनस्पतीचा लेप गुणकारी ठरतो.

जनावरांमधील विषबाधेची लक्षणेपोट गच्च होते, पोटाची हालचाल व प्रक्रिया मंदावते, चारा खाणे व रवंथ करणे या प्रक्रिया बंद होतात. संडास व लघवी होण्याची प्रक्रियाही मंदावते. जांघेत व मानेच्या खाली सूज येऊन पाणी जमा होते. अशक्तपणा वाढून अंग गार पडून थरथर कापू लागते, ही लक्षणे आढळल्यास ७ ते ८ दिवसांत जनावर दगावते.

उपचारएक किलो चुना दहा लिटर पाण्यात मिसळून चांगले ढवळून दहा तास स्थिर ठेवलेली ही चुन्याची निवळी दिवसातून तीन वेळेस एक ते दीड लिटर या प्रमाणात पाजावी. गुळाची काकवी २५0 ग्रॅम, रेचक (पॅरोलेक्स बोव्हीरीम)च्या गोळ्या द्याव्यात. तोंडातून व शिरेतून कॅल्शियमसह ‘ब’ जीवनसत्त्वाचे इंजेक्शनही दिले जाते.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर