शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

हात-पाय बांधून जवानावर पत्नीकडून विषप्रयोग, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील धक्कादायक प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 12:03 IST

पत्नीला अटक, अज्ञात साथीदाराचा कसून शोध

गडहिंग्लज : सुट्टीवर गावी आलेल्या जवानाला पत्नी व तिच्या अनोळखी साथीदाराने डोळे आणि हात-पाय बांधून नाका-तोंडावाटे विष पाजून जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. याप्रकरणी पत्नी तेजस्विनी अमर देसाई (मूळ गाव नूल, ता. गडहिंग्लज, सध्या रा. पाटणे पाईप कारखान्याजवळ संकेश्वर रोड, गडहिंग्लज) हिला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या अज्ञात साथीदाराचा पोलिस कसून शोध घेत आहेत. दोघांच्याविरूद्ध भारतीय न्याय संहितेनुसार (बीएनएस) गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे नूल पंचक्रोशीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, नूल येथील जवान अमर भिमगोंडा देसाई हे भारतीय सैन्यदलात जम्मू-काश्मिर येथे कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी येथील पाटणे पाईप कारखान्याजवळ दुमजली घर बांधले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या पत्नी तेजस्विनी या मुलगा व मुलीसह गडहिंग्लजमध्ये राहतात. अमर हे सध्या सुट्टीवर गावी आले आहेत.गुरूवारी (१८) रात्री साडेनऊच्या सुमारास जेवणानंतर अमर हे घरात झोपले होते. त्यावेळी तेजस्विनी व तिच्या अनोळखी साथीदाराने संगनमताने त्यांचे डोळे आणि हात-पाय बांधून नाका-तोंडावाटे त्यांना विष पाजले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या अमर यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला.अमर यांच्या ओरडण्यामुळे जमलेल्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी ‘त्या’ अनोळखी साथीदाराने मदतीसाठी धावलेल्या खाडे यांच्या डोकीत कशानेतरी मारहाण करून पलायन केले.दरम्यान, घटनास्थळी जमलेल्या लोकांनीच अमर आणि खाडे यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. अमर यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार अधिक तपास करीत आहेत.नूल पंचक्रोशीत खळबळ !जवान अमर यांचे मूळगाव नूल असून तेजस्विनी हिचे माहेर हेब्बाळ काानूल आहे. लग्नानंतर कांही वर्षे हेब्बाळमध्ये वास्तव्यास होते. दरम्यान, त्यांनी गडहिंग्लजमध्ये घर बांधले असून मुलांच्या शिक्षणासाठी ते गडहिंग्लजमध्ये राहतात. या घटनेमुळे नूल, हेब्बाळसह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. अत्यवस्थ जवानाला पुण्याला हलवले!गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर अत्यवस्थ जवान अमर यांच्यावर  पुणे येथील सैन्य दलाच्या रूग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत,अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस