बजेटमध्ये सामान्य नागरिकांचा खिसा रिकामाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST2021-02-05T07:08:33+5:302021-02-05T07:08:33+5:30
कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सर्वसामान्य नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. या ...

बजेटमध्ये सामान्य नागरिकांचा खिसा रिकामाच
कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सर्वसामान्य नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. या बजेटमधून सर्वसामान्य नागरिकाचा खिसा रिकामाच राहिल्याची भावना लोकांशी बोलल्यानंतर व्यक्त झाली.
बजेट म्हटले की, कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या क्षेत्रांना त्यातून काय मिळणार याबद्दल कमालीची उत्सुकता असते. त्यात शेती, साखर उद्योग, फौंड्री, इचलकरंजी वस्त्रोद्योग या प्रमुख क्षेत्रांचा समावेश होतो. त्यात साखर व दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने बेदखल केले आहे. पंधरा वर्षांपूर्वीची जुनी वाहने निकामी करण्यात येणार असल्याने नव्या वाहनांची मागणी वाढेल. त्याचा परिणाम म्हणून फौंड्री उद्योगाला चांगले दिवस येतील, अशी आशा कोल्हापुरातील उद्योग क्षेत्रातून व्यक्त झाली. ही एकमेव जमेची बाजू असली तरी अजूनही इंधन दरवाढ होणार असल्याने लोकांच्या पोटात महागाईच्या धसक्याने भीतीचा गोळा उठला. अर्थसंकल्पात सामान्य माणसाला दिलासा मिळू शकेल, असे ठोस काहीच नसल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली.