शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातील एकालाच पीएम किसानचा लाभ, आजपासून हप्ता खात्यावर वर्ग होणार; कोल्हापूर जिल्ह्यात किती लाभार्थी..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:45 IST

जुन्या खात्यांची तपासणी सुरू; लाभार्थींची संख्या कमी होणार

राजाराम लोंढेकोल्हापूर : पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने डिसेंबर २०१८ मध्ये पीएम किसान योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून चार महिन्याला दोन हजार प्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. कोल्हापूर जिल्ह्यात साडेपाच लाखांहून अधिक लाभार्थी पहिल्या टप्प्यात होते; मात्र त्यातील ४ लाख ७६ हजार ७५१ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला. त्यानंतर निकष डावलून काहीजण लाभ घेत असल्याचे सरकारच्या लक्षात आल्यानंतर छाननी केली. यामध्ये १३ हजार ४३७ लाभार्थ्यांना अपात्र ठरवले. त्यांच्याकडून १३ कोटी रकमेची वसुलीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली.

वारसा हक्काने जमीन येणाऱ्यांनाच लाभया योजनेवर होणारा खर्च पाहून केंद्र सरकारने योजनेवर मर्यादा आणण्यास सुरुवात केली आहे. सर्व निकषांची चाळण एकीकडे लावली जात असताना दुसऱ्या बाजूला २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या जमीनधारकांनाच लाभ मिळणार आहे; पण वारसा हक्काने जमीन नावावर असलेल्यांना लाभ दिला जाणार आहे.

कुटुंब म्हणजे काय?एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पती, पत्नी व अठरा वर्षांखालील मुलगा ही कुटुंबाची व्याख्या आहे. अठरा वर्षांवरील मुलग्याच्या नावावर क्षेत्र असेल तर त्याला लाभ मिळणार आहे.

आजपासून हप्तापीएम किसान चा १९ वा हप्ता सोमवार (दि. २०) पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. तोपर्यंत नवीन निकषानुसार चाळण लावली जाणार आहे.

सततच्या ‘केवायसी’ डोकेदुखीसरकार योजनेत पात्र राहण्यासाठी सतत ई-केवायसीची सक्ती करते. लाभार्थ्यांनी नोंदणी करतानाच सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली असते. तरीही सहा महिने-वर्षाला ‘ई केवासी’ पूर्तता करावी लागते.

दृष्टिक्षेपात पीएम किसान योजनेचे लाभार्थी

  • नोंदणी केलेले - ५ लाख ३७ हजार ०२१
  • पहिला हप्ता मिळालेले लाभार्थी - ४ लाख ७६ हजार ७५१
  • पहिल्या तपासणीत अपात्र - १३ हजार ४३७
टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाbankबँकCentral Governmentकेंद्र सरकार