खेड्यातील जीवन आनंददायी
By Admin | Updated: January 14, 2015 00:35 IST2015-01-13T22:54:25+5:302015-01-14T00:35:46+5:30
विजय भोसले : म्हाकवे येथे सत्संग व्याख्यानमालेस प्रारंभ

खेड्यातील जीवन आनंददायी
म्हाकवे : शहरांपेक्षा खेड्यांतील जीवन आनंदी, निरोगी आणि चैतन्यमय असते. सध्या खेड्यांनीही शहरीकरणाची आस धरल्याने कुटुंबातील सुसंवाद हरवत चालला आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी पुढाकार घेऊन कुटुंबातील सुसंवाद वाढवावा, असे आवाहन प्रा. विजय भोसले (कोल्हापूर) यांनी केले.
म्हाकवे (ता. कागल) येथील सत्संग व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सदाशिव पाटीव होते. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
महिला चैतन्यमयी, उत्साही आणि तितकीच संयमी असेल, तर त्या घरातील वातावरण प्रसन्न असते. पैसा, दागदागिन्यांपेक्षा संस्कारमूल्य आपल्या भावी पिढीला प्रेरणादायी ठरणारी आहेत. इंग्रजी जरूर शिका, पण आपली मूळ संस्कृती विसरू नका, असे आवाहनही प्रा. भोसले यांनी केले.
प्रा. कृष्णात पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रमेश छाबडा यांनी दीपप्रज्वलन केले. धन्वंतरी पूजन वसंतराव मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘सत्संग’चे प्रमुख श्रीकांत पाटील, माजी सरपंच वर्षा पाटील, महाराष्ट्र बँकेचे शाखाधिकारी साबळे, आर. एस. पाटील, माजी उपसरपंच रामचंद्र पाटील, पंढरीनाथ पाटील, सरपंच तानाजी पाटील (बस्तवडे), आदी उपस्थित होते. सुनील पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)
...तर धाबा संस्कृतीला अटकाव
महिलांनी आपल्या घरात रुचिदार आणि नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ करण्याची पाककला आत्मसात करावी. यामुळे आजच्या तरुणाईमधील वाढती धाबा संस्कृती निश्चितच कमी होईल, असा विश्वासही प्रा. भोसले यांनी व्यक्त केला.