नियोजनातील विषय : जिल्ह्यातील पहिल्या रुग्णांसह ४७ हजार कोरोना रुग्ण ठणठणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:38 IST2020-12-15T04:38:57+5:302020-12-15T04:38:57+5:30
जिल्ह्यातील पहिला रुग्ण म्हणून पुण्यातील पुरुष व्यक्तीची नोंद झाली, नंतर त्याची बहीणसुद्धा पुढे तीन दिवसांनी पॉझिटिव्ह आली. ज्या संसर्गाला ...

नियोजनातील विषय : जिल्ह्यातील पहिल्या रुग्णांसह ४७ हजार कोरोना रुग्ण ठणठणीत
जिल्ह्यातील पहिला रुग्ण म्हणून पुण्यातील पुरुष व्यक्तीची नोंद झाली, नंतर त्याची बहीणसुद्धा पुढे तीन दिवसांनी पॉझिटिव्ह आली. ज्या संसर्गाला रोखायचे असा निर्धार प्रशासनाने केला, तोच कोरोनाचा विषाणू पाहुणा बनून आला आणि बघता-बघता त्याने संपूर्ण जिल्ह्यावर संसर्गाची छाया गडद करून टाकली. गेल्या आठ नऊ महिन्यांत जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा आता ५० हजारांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय. महत्त्वाचे म्हणजे आता संसर्ग थांबला असून कोरोना साथ जवळपास संपल्यात जमा आहे.
पुण्यातील हा पाहुणा आणि त्याची कोल्हापुरातील बहीण आता ठणठणीत आहेत. बरे होऊन घरी परतल्यानंतर काही दिवस खाण्या-पिण्याचे पथ्य व थोडा व्यायाम केला. आता तेही बंद आहे. कोरोना पॉझिटिव्ह शिक्का बसल्यानंतर काही दिवस खूप त्रास झाला असे बहीण-भाऊ सांगतात. बरे होऊन घरी गेल्यानंतरही नात्यांतील, शेजारील लोक जवळ येत नव्हते, फोनवरच चौकशी करायचे. आजारच तसा होता. माजी नगरसेवक किरण नकाते यांनी आमच्या कुटुंबाला खूप मदत केली, असे ते आवर्जून सांगतात.
रुग्णालयातील उपचाराबाबत दोघांनी तीव नाराजी व्यक्त केली. उपचारादरम्यान ब्रदर व सिस्टर दोन दिवसांतून एकदा रूममध्ये येऊन विचारपूस करायचे, औषधांची चौकशी करायचे.आधार द्यायचे; पण रुग्णालयाचा अनुभव काही चांगला नव्हता. बरे झाल्यानंतर भावाला धड पुण्याला जाता येईना आणि कोल्हापुरात आमच्या घरीही राहता येईना, अशी विचित्र अवस्था झाली होती. नाईलाज म्हणून भावाला महिनाभर रुग्णालयात राहावे लागले, असे त्यांनी सांगितले.
- पहिला रुग्ण कसा ट्रेस झाला? उपचार कसे झाले?
पुण्याहून आल्यानंतर ताप, खोकला सुरू झाला. कोरोनाच्या भीतीमुळे दोन तीन दिवस घरातच अंगावर काढले नंतर सीपीआर रुग्णालयात तपासणी करून घेण्याचा निर्णय घेतला. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सीपीआरमध्ये कोरोनाची कक्ष सुरू नसल्याने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथेच त्यांच्यावर उपचार झाले.
पॉईटर -
- २६ मार्चला आढळला जिल्ह्यात पहिला रुग्ण, पाठोपाठ २९ मार्चला त्याच घरातील दुसरा रुग्ण आढळला.
- प्रत्येक महिन्याला असे वाढले रुग्ण -
मार्च -०२
एप्रिल - १५
मे - ६१४
जून- ८७३
जुलै - ५६५९
ऑगस्ट - ६४४३
सप्टेंबर - २४ हजार ४१९
ऑक्टोबर - ४४ हजार ७४३
नोव्हेंबर - ४६ हजार २२३
डिसेंबर - ४९ हजार ०८२