प्लॅन विषय : कोल्हापुरात कोविड चाचण्या उद्दिष्टापेक्षा ४० टक्केच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST2020-12-05T04:57:47+5:302020-12-05T04:57:47+5:30
कोल्हापूर : राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांना कोविड चाचण्यांचे उद्दिष्ट ठरवून दिले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात मात्र ...

प्लॅन विषय : कोल्हापुरात कोविड चाचण्या उद्दिष्टापेक्षा ४० टक्केच
कोल्हापूर : राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांना कोविड चाचण्यांचे उद्दिष्ट ठरवून दिले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात मात्र दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ४० टक्केच चाचण्या होत आहेत. कोविडची साथ संपत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेत आलेली शिथिलता, सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असली तरी कोविड चाचणी करून घेण्याकडे नागरिकांचे होत असलेले दुर्लक्ष यांमुळे हे प्रमाण घटले आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी गेल्याच आठवड्यात एक अधिसूचना जारी करून प्रत्येक जिल्ह्यातील कोविड चाचण्यांचे प्रमाण जास्तीत जास्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय जिल्ह्याची लोकसंख्या, पॉझिटिव्हचे प्रमाण आणि सध्या करीत असलेल्या कोविड चाचण्या यांच्या आधारावर जिल्हा आणि महानगरपालिका यांनी दैनंदिन करावयाच्या चाचण्यांची संख्या निश्चित केली आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यास दैनंदिन १५५० चाचण्यांचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे.
उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी संयुक्त परिपत्रक काढून अशा चाचण्या वाढविण्यासंदर्भात जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती कार्यालय यांना शुक्रवारी कळविले आहे.
रोज होतात ६०० ते ७०० चाचण्या
आरोग्य विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला दैनंदिन १५५०, तर महानगरपालिकेला ११७१ कोविड चाचण्यांचे उद्दिष्ट दिले आहे; परंतु सध्या ४०० ते ५०० आरटीपीसीआर चाचण्या; तर १५० ते २०० रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. शहरात तर हे प्रमाण खूपच कमी आहे.
किट्स उपलब्ध, पण स्राव कमी
छत्रपती प्रमिलाराजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व प्रयोगशाळेकडे रोज दोन हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे. तेथे दोन अत्याधुनिक यंत्रे आहेत. चाचण्यांसाठी लागणारी किट्स उपलब्ध आहेत; परंतु तपासणीला येणाऱ्या स्रावांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे.
कोट-
आरोग्य विभागाने दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे रोज चाचण्या करण्याची आपल्या प्रयोगशाळेची क्षमता आहे; परंतु तेवढे स्राव येत नाहीत, यंत्रणा आहे, किट्स आहेत. चाचणीसाठी कोणतीच अडचण येणार नाही.
- डॉ. एस. एस. मोरे, अधिष्ठाता
- जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालयाने दिलेले उद्दिष्ट
- तालुका --- -- रॅपिड ॲन्टिजेन ------- आरटीपीसीआर
आजरा २० ३६
भुदरगड २५ ४६
चंदगड ३१ ५७
गडहिंग्लज ३७ ६८
हातकणंगले १३२ २४५
कागल ४५ ८३
करवीर ८० १४८
पन्हाळा ४२ ७९
राधानगरी ३३ ६०
शाहूवाडी ३० ५६
शिरोळ ६४ ११८
कोल्हापूर शहर ४१० ७६१
एकूण ९५२ १७६८