पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, उत्तरेश्वर-शुक्रवार पेठेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 17:04 IST2019-04-27T17:03:03+5:302019-04-27T17:04:09+5:30

कोल्हापूर येथील उत्तरेश्वर आणि शुक्रवार पेठ येथे भरवस्तीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत पाच कुत्र्यांचा चावा घेतला. त्याला मारण्यासाठी गेलेल्या तिघा तरुणांपैकी एकाचा त्याने चावा घेतला. नूतन मोहन ओतारी (वय ५०) असे जखमीचे नाव आहे. सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्या कुत्र्याला ठार मारल्यानंतर भयभीत झालेल्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

Pimples of pimped dogs, types of pitches in Uttareshwar and Fridays | पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, उत्तरेश्वर-शुक्रवार पेठेतील प्रकार

पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, उत्तरेश्वर-शुक्रवार पेठेतील प्रकार

ठळक मुद्देपिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळउत्तरेश्वर-शुक्रवार पेठेतील प्रकार

कोल्हापूर : येथील उत्तरेश्वर आणि शुक्रवार पेठ येथे भरवस्तीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत पाच कुत्र्यांचा चावा घेतला. त्याला मारण्यासाठी गेलेल्या तिघा तरुणांपैकी एकाचा त्याने चावा घेतला. नूतन मोहन ओतारी (वय ५०) असे जखमीचे नाव आहे. सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्या कुत्र्याला ठार मारल्यानंतर भयभीत झालेल्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

अधिक माहिती अशी, उत्तरेश्वर पेठेत शुक्रवारी नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ सुरु होती. दुपारी बाराच्या सुमारास एक पिसाळलेले कुत्रे परिसरात आले. त्याने येथील पाळीव कुत्र्यांवर हल्ला चढविला. हा प्रकार पाहून येथील रहिवाशांनी गेट, दरवाजे बंद करून घेतले. काही लोकांनी त्याला पिटाळून लावल्यामुळे ते शुक्रवार पेठेत घुसले. विठाई अपार्टमेंटमध्ये नूतन ओतारी यांचा नातू खेळत होता.

या बालकावर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नूतन यांनी नातवाला उचलून घेतल्यामुळे तो बचावला; परंतु कुत्र्याने त्यांच्या हाताचा चावा घेतला. पिसाळलेल्या कुत्र्याच्या धुमाकुळामुळे नागरिक भयभीत झाले. येथील तरुणांनी त्याचा पाठलाग करून त्याला ठार मारले.
 

 

Web Title: Pimples of pimped dogs, types of pitches in Uttareshwar and Fridays