शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
3
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
4
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
5
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
6
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
7
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
8
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
9
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
10
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
11
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
12
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
13
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
14
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
15
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
16
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
17
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
18
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
19
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
20
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना

गाडी, बंगल्याचा हव्यास बायकोच्या गळी.. छळाने जातो तिचाच बळी

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 29, 2023 12:19 IST

एकीकडे मुली मिळत नाहीत म्हणून अनेक मुलांचे लग्न होत नाहीत. दुसरीकडे मिळालेली पत्नी, सुनेचा हुंड्यासाठी छळ

इंदुमती गणेशकोल्हापूर : नव्या फ्लॅटसाठी माहेराहून पैसे आण, नवी गाडी घेऊन द्यायला सांग, नोकरी लावून द्या, नोकरीसाठी पैसे द्या अशा पुरुषसत्ताक पद्धतीच्या शारीरिक व मानसिक छळांपासून विवाहिता व बालकांचे आयुष्य वाचवायचे असेल तर तिला शिक्षणाने आर्थिक स्वावलंबी बनविणे हाच शाश्वत उपाय आहे. मुलगी सासरी दिली की आपली जबाबदारी संपली, ही पालकांची मानसिकता, सून-पत्नी ही अधिकार गाजविण्यासाठीच असते हा अहंकार आणि आपलं कुणी नाही ही अगतिकता तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरते.गारगोटी येथील विवाहितेने दोन वर्षांच्या बाळासह आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. ही प्रातिनिधिक घटना असली तरी पिढ्यानपिढ्यांपासून समाजात हेच घडत आले आहे. कारणं वेगवेगळी असली तरी विवाहितेचा आणि बालकांचा बळी हेच अंतिम सत्य ठरते. 

शिक्षणाने आर्थिक स्वावलंबी बनवा..

आर्थिक सक्षम असलेल्या स्त्रीमध्ये कोणत्याही प्रसंगाला धाडसाने निभावून नेण्याचा आत्मविश्वास आपसूक येतो. त्यामुळे मुलींना किमान पदवीपर्यंतचे शिक्षण देणे व त्यानंतर नोकरी, व्यवसाय किंवा कलाकौशल्याने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे अत्यंतिक महत्त्वाचे आहे. असे झाले तर पैशासाठी होणारा छळ कमी होईल. छळ झालाच तर ती घराबाहेर पडून स्वत:चे व मुलांचे पालनपोषण करू शकेल इतकी सक्षम राहील.

माहेरचीही तितकीच जबाबदारीएकदा तुझं लग्न करून दिलं ना आाता तू तिथेच जगायचं..तुझा शेवटही तिथेच ही पालकांची मानसिकता मुलींसाठी घातक आहे. आपण न सासरचे ना माहेरचे या टोकाच्या विचारापर्यंत मुली जातात. आधीच वर्षानुवर्षे छळ सोसताना आलेली अगतिकता असह्य झाल्यावर आपल्या पाठीशी कोणी नाही याची जाणीव आत्महत्येला प्रवृत्त करते. त्यामुळे पालकांनी वेळीच दखल घेऊन या त्रासातून बाहेर काढण्यासाठी तिला मदत केली पाहिजे.

समुपदेशक, कायद्याची मदत घ्याछळाला मृत्यू हा अंतिम पर्याय असू शकत नाही. त्यातून सुटका व्हायची असेल तर समुपदेशकांची, महिला तक्रार निवारण कक्षाची, भरोसा सेलसारख्या विभागाची मदत घ्या. समजुतीने किंवा कायद्याच्या धाकाने फरक नाहीच पडला तर वेगळे राहून किमान शांत आयुष्य जगता येते.

मुलगी मिळेपर्यंत पुरेवाट..एकीकडे मुली मिळत नाहीत म्हणून अनेक मुलांचे लग्न होत नाहीत. दुसरीकडे मिळालेली पत्नी, सुनेचा हुंड्यासाठी छळ हाेतो हे दोन टोकाचे विरोधाभास समाजात दिसतात.

स्त्रियांसाठी अनेक कायदे असले तरी समाजाची मानसिकता बदलणे आणि शिक्षणातून आर्थिक स्वावलंबन हाच कायमस्वरुपी उपाय आहे. पत्नी किंवा सून मिळाली हेच खूप महत्त्वाचे आहे. माहेरकडून हुंडा पाहिजेच कशाला, यावर सासरच्या मंडळींचे प्रबोधन झाले पाहिजे. -ॲड. मंजूषा पाटील 

मुलगी किमान २१ वर्षांची झाल्याशिवाय, मुलाच्या कुटुंबीयाची पूर्णत: चौकशी केल्याशिवाय लग्न करू नये. माहेरचे दरवाजे तिच्यासाठी उघडे आहेत याचा विश्वास आणि समान हक्क दिला पाहिजे. पत्नी, सून, आई या भूमिका निभावताना व्यक्ती म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतंत्र अस्तित्व जपले पाहिजे. - अनुराधा मेहता, महिला दक्षता समिती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिलाDivorceघटस्फोट