महापालिकेची दोन खाती पीएफ विभागाने गोठवली-सौरभ सुमन प्रसाद यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 17:05 IST2019-11-20T17:04:06+5:302019-11-20T17:05:24+5:30
४ वेळा याबाबत सुनावण्या झाल्या. १८ फेबु्रवारी २0१९ रोजी याचा निकाल लागून २८ जून रोजी याबाबतचे अंतिम आदेश जारी करण्यात आले.

महापालिकेची दोन खाती पीएफ विभागाने गोठवली-सौरभ सुमन प्रसाद यांची माहिती
कोल्हापूर : कंत्राटी आणि दैनंदिन रोजंदारीवर असणाºया कर्मचाऱ्यांचा जानेवारी २0११ ते आॅगस्ट २0१२ दरम्यानचा ४ कोटी ९३ लाख ७६ हजार रूपयांचा पीएफ थकवल्याप्रकरणी कोल्हापूर महापालिकेची दोन खाती पीएफ विभागाने तात्पुरती गोठवली आहेत. क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त सौरभ सुमन प्रसाद यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
केंद्र सरकारच्या अधिसुचनेनुसार ८ जानेवारी २0११ पासून महानगर पालिका आणि नगरपरिषदांचे कर्मचारी भविष्य निधी कायद्याच्या कक्षेत आले आहेत. कायदा कलम ७ अ नुसार २७ सप्टेंबर २0१२ पासून याबाबत ७ वर्षे न्यायालयीन कार्यवाही सुरू होती. ३४ वेळा याबाबत सुनावण्या झाल्या. १८ फेबु्रवारी २0१९ रोजी याचा निकाल लागून २८ जून रोजी याबाबतचे अंतिम आदेश जारी करण्यात आले.