शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Crime News kolhapur: दारू पिऊन सततचा त्रास, रागाने पत्नीनेच केला पतीचा गळा आवळून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 13:28 IST

गीताने त्याच दोरीने स्वयंपाकघरातील तुळईस फास लावून घेतल्याप्रमाणे पतीचा मृतदेह टांगून आत्महत्येचा बनाव केला

म्हासुर्ली : कोनोली तर्फ असंडोलीपैकी पानारवाडी (ता. राधानगरी) येथे पती दारू पिऊन सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून पत्नीने दोरीने गळा आवळून पतीचा खून केला. गणपती आनंदा कानडे (वय ३९) असे मृताचे नाव आहे.हे प्रकरण आपल्या अंगलट येण्याच्या शक्यतेने संशयित आरोपी महिलेने मृतदेह दोरीने तुळईस टांगून, पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला होता. संशयित आरोपी गीता गणपती कानडे (वय ३०) हिला गुरुवारी रात्रीच राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, कोनोली तर्फ असंडोलीपैकी पानारवाडी येथे राहणाऱ्या गणपती व गीताचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला. त्यांना दोन अपत्ये आहेत. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे चिडलेल्या गीताने घरात कोणी नसल्याचे पाहून पतीचा गळा दोरीने आवळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनास्थळी डीवायएसपी साळुंखे, राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे आणि खान यांनी भेटी देऊन तपासाबाबत सूचना केल्या.

आत्महत्येचा बनाव उघडगीताने त्याच दोरीने स्वयंपाकघरातील तुळईस फास लावून घेतल्याप्रमाणे पतीचा मृतदेह टांगून आत्महत्येचा बनाव केला. घराबाहेर येऊन आरडाओरडा केल्याने गल्लीतील नागरिकांनी त्यास तत्काळ खाली उतरवून रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी शंका आल्याने मृतदेह थेट पोलीस ठाण्यात नेला असता, पोलिसांनीही याबाबत शंका व्यक्त केली. तसेच गीताकडे अधिक चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या वस्तूही जप्त केल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी