शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जनतेनेच जनता कर्फ्यूला नाकारले, बंद दुकानेही झाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 17:59 IST

कोल्हापूर शहरात शनिवारी बहुतांश दुकाने सुरू होती. जनतेनेच जनता कर्फ्यूला नाकारल्याचे यामुळे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे शुक्रवारी जी काही दुकाने बंद होती, त्यांपैकी बहुतांश व्यावसायिकांनी शनिवारी दुकाने सुरू केली.

ठळक मुद्देजनतेनेच जनता कर्फ्यूला नाकारले, बंद दुकानेही झाली सुरूचेंबर ऑफ कॉमर्स, महापौर यांच्या विनंतीला प्रतिसाद मिळेना

 कोल्हापूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. परंतु फेरीवाले, व्यापारी, भाजी विक्रेते यांच्यासह नागरिकांनीही याचे पालन केले नाही. शनिवारी शहरात बहुतांश दुकाने सुरू होती. नागरिकही खरेदीसाठी मोठ्या संख्येने रस्त्यांवर होते. जनतेनेच जनता कर्फ्यूला नाकारल्याचे यामुळे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे शुक्रवारी जी काही दुकाने बंद होती, त्यांपैकी बहुतांश व्यावसायिकांनी शनिवारी दुकाने सुरू केली.शहरात कोरोनचे रोज २५० पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून रुग्णसंख्या १० हजारांवर झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे यांनी ११ ते १६ सप्टेंबरदरम्यान, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

यानंतर महापौर निलोफर आजरेकर यांनी १२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जनता कर्फ्यूचे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पालन करावे, अशी विनंती केली होती. काही दुकाने वगळता याचे पालन कोणीही केले नसल्याचे शनिवारी दिसून आले.

लक्ष्मीपुरी येथील धान्य बाजार दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद होता. शिवाजी चौक ते पापाची तिकटी मार्गावरील चप्पल लाईन शुक्रवारी कडकडीत बंद होती. मात्र, शनिवारी येथील १० ते १५ दुकाने सुरू होती. शिवाजी पेठेमध्ये दुसऱ्या दिवशी नागरिकांची वर्दळ कायम होती. उभा मारुती चौक, साकोली कॉर्नर, निवृत्त चौक, तटाकडील तालीम येथील दुकाने सुरू होती.भाजी मंडई सुरूकपिलतीर्थ मार्केट, शाहू उद्यान मार्केटमधील विक्रेत्यांनी जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होत शुक्रवारी (दि. ११) व्यवसाय बंद केले होते. यामुळे भाजी मंडईमध्ये शुकशकाट होता. शनिवारी मात्र, पूर्वीप्रमाणेच मंडया सुरू झाल्या. खरेदीसाठी काही लोकांची वर्दळ होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर