शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

आणीबाणीतील ५८ सत्याग्रहींना मिळणार पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:10 AM

आणीबाणीच्या लढ्यातील सत्याग्रहींना पेन्शन देण्याची ५८ प्रकरणे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंजूर केली आहेत. पेन्शनसाठी दर महिन्याला साडेतीन लाख रुपयांचा निधी आवश्यक असून, त्या स्वरूपाचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्देआणीबाणीतील ५८ सत्याग्रहींना मिळणार पेन्शनजिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकरणे मंजूर : शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविला

कोल्हापूर : आणीबाणीच्या लढ्यातील सत्याग्रहींना पेन्शन देण्याची ५८ प्रकरणे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंजूर केली आहेत. पेन्शनसाठी दर महिन्याला साडेतीन लाख रुपयांचा निधी आवश्यक असून, त्या स्वरूपाचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे.आणीबाणीच्या लढ्यातील सत्याग्रहींना व त्यांच्या कुटुंबांना पेन्शन मिळावी या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सत्याग्रहींसाठी त्यांच्या कुटुंबीयांचा लढा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्ह्यातून १०५ अर्ज आले होते. त्यामधील निकषामध्ये बसणारी ५८ प्रकरणे जिल्हाधिकाºयांनी मंजूर केली आहेत.

आणीबाणीमध्ये एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या सत्याग्रहींना १० हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यांचा मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पत्नीला पाच हजार रुपये पेन्शन मिळेल. तसेच एक महिन्यापेक्षा कमी कारावास झालेल्या सत्याग्रहींना पाच हजार रुपये व त्यांचा मृत्यू झाला असल्यास पत्नीस अडीच हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

जिल्ह्यातील ५८ पेन्शनधारकांसाठी महिन्याला सुमारे साडेतीन लाख रुपयांची गरज आहे. हा निधी मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर होऊन पुढील महिन्यापासून ही पेन्शन लाभार्थ्यांना मिळेल, यादृष्टीने पाठपुरावा सुरू आहे. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर