गारगोटी एस.टी. वर्कर्स आगार संघटनेच्या अध्यक्षपदी रानमाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:23 IST2021-02-07T04:23:07+5:302021-02-07T04:23:07+5:30
गारगोटी : येथील महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या गारगोटी आगार अध्यक्षपदी संदीप दिनकर रानमाळे (पाचवडे) यांची, तर आगार ...

गारगोटी एस.टी. वर्कर्स आगार संघटनेच्या अध्यक्षपदी रानमाळे
गारगोटी : येथील महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या गारगोटी आगार अध्यक्षपदी संदीप दिनकर रानमाळे (पाचवडे) यांची, तर आगार सचिवपदी दत्तात्रय डवरी (गंगापूर) यांची निवड झाली. विक्रम कुंभार, सुरेश तेलंग, शहाजी पाटील, जयकुमार देसाई यांच्या नेतृत्वाखाली एकमताने निवडी पार पडल्या.
अन्य कार्यकारिणी अशी उपाध्यक्ष अक्षय भोसले (मडीलगे), कार्याध्यक्ष : वाय. एन. पाटील (मुदाळ), खजिनदार : प्रवीण खतकर (करडवाडी), महिला संघटक : शीतल सुतार, दीपाली पंडित, प्रसिद्धीप्रमुख : सुरेश शेवाळे, दयानंद पाटील.
यावेळी रमेश जाधव, अशोक माडेकर, तानाजी सुतार, बाजीराव खेगडे, संदीप चौगले, आनंदा ढेकळे, सुरेश शेटके, गजानन पाटील, संदीप शेंडे, विजय सुतार, चंद्रकांत डवरी यांचे मार्गदर्शन लाभले.
---
फोटो :
रानमाळे, डवरी