तमनाकवाडातील जनतेच्या हितासाठीच पाझर तलाव हस्तांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:17+5:302021-06-09T04:30:17+5:30

सरपंच अलका साळवी, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी तलावाचे बांधकाम अपूर्ण असताना घाई गडबडीत तलावाचे हस्तांतरण का करून ...

Pazhar Lake transferred for the benefit of the people of Tamanakwada | तमनाकवाडातील जनतेच्या हितासाठीच पाझर तलाव हस्तांतरित

तमनाकवाडातील जनतेच्या हितासाठीच पाझर तलाव हस्तांतरित

सरपंच अलका साळवी, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी तलावाचे बांधकाम अपूर्ण असताना घाई गडबडीत तलावाचे हस्तांतरण का करून घेतले, तसेच या तलावाच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर तमनाकवाडा (ता. कागल) येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भिकाजी तिप्पे, दिलीप तिप्पे, धोंडिबा तिप्पे, उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले की, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना गेल्या पाच वर्षांत गावात विविध विकामकामे केली आहेत. रखडलेला पाझर तलावही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मदतीने पूर्ण केला. त्याची पूर्तता माझ्याच कारकीर्दीत व्हावी, त्यावरील गावची नळयोजना मंजूर करून घ्यावी म्हणून तत्कालीन ग्रामपंचायतीत ठराव करून तलाव हस्तांतरण केला.

जलसिंचन विभागाकडून पत्र घेताना यामध्ये उर्वरित काम पूर्ण करण्याची अटही आहे. याचबरोबर या तलावाची मालकी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद जलसिंचन विभागाकडेच राहणार आहे. यामध्ये कोणतीही खोटी कागदपत्रे तयार केलेली नाहीत. आता उरलेले काम करून भाग दोन म्हणून हस्तांतर व्हावे, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. यावेळी महादेव तिप्पे, बचाराम मशाळकर, युवराज चव्हाण, आदी उपस्थित होते.

Web Title: Pazhar Lake transferred for the benefit of the people of Tamanakwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.