पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके ‘पंधराव्या वित्त’मधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:17 IST2021-06-24T04:17:32+5:302021-06-24T04:17:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास ग्रामपंचायतींना मान्यता देण्यात आल्याची ...

Payments for street lights, water supply schemes from 'Fifteenth Finance' | पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके ‘पंधराव्या वित्त’मधून

पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके ‘पंधराव्या वित्त’मधून

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास ग्रामपंचायतींना मान्यता देण्यात आल्याची माहीती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी दिली.

राज्यात सध्या कोरोना परिस्थितीमुळे ग्रामीण भागात अनेक अडचणी आहेत. अनेक ठिकाणी पथदिव्यांची तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके अदा न झाल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सद्य: परिस्थिती पाहता पंधराव्या वित्त आयोगाच्या अबंधित अनुदानातून पथदिव्यांची देयके आणि बंधित अनुदानातून पाणीपुरवठा योजनांची देयके अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीने त्यांना प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ही देयके अदा करावयाची आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळणार असून देयकांच्या पूर्ततेअभावी कोणत्याही गावात पथदिव्यांची वीज किंवा पाणीपुरवठा योजना खंडित होणार नाही, असे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना

राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना अनुक्रमे ८०:१०:१० प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. या निधीतील सर्वाधिक ८० टक्के भाग थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. त्यामुळे गावांचा विकास झपाट्याने होण्यास मदत होत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

Web Title: Payments for street lights, water supply schemes from 'Fifteenth Finance'