शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

पैसे भरा, अन्यथा फौजदारी...

By admin | Updated: September 3, 2015 00:25 IST

आदेशाला केराची टोपली : थेट कारवाईला गटविकास अधिकाऱ्यांची बगल

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर  निंगुडगे (ता. आजरा) येथील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणात शासनाच्या केलेल्या नुकसान भरपाईपोटी तत्कालीन सरपंच, उपसरपंचासह सदस्य अशा १४ जणांना प्रत्येकी १२ हजार ५३१ रुपये भरा, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश २०१० मध्ये दिला आहे. आदेश देऊन पाच वर्षे झाली तरी अद्याप एक छदामही भरलेला नाही. पोलिसांत गुन्हाही दाखल झालेला नाही. त्यामुळे थेट कारवाईला आजरा गटविकास अधिकारी का बगल देत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.  विनापरवाना, चोरट्या निलगिरी वृक्षतोड प्रकरणातील पैसे वसुलीची नोटीस तत्कालीन सरपंच संगीता कुंभार, महेश भोसले, मारुती मगदूम, सविता देसाई, हिराबाई मगदूम, बळवंत गंधवाले, संभाजी सरदेसाई, आनंदा कांबळे, बजरंग सरदेसाई, अंतू कांबळे, प्रभाकर चव्हाण, रमेश गंधवाले, रुक्मिणी कुंभार, शालन देसाई यांना दिली आहे. तक्रारदार अमृत देसाई, दिनकर मगदूम यांनी कारवाईसाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. कारवाईसंबंधी विचारणा केल्यानंतर गटविकास अधिकारी थातुरमातुर उत्तरे देऊन बोळवण करीत आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाईचा आदेश देऊनही गटविकास अधिकारी तो धुडकावून लावत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कारवाई न करण्यामागे कोणत्या तरी राजकीय शक्तीचा हात आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. बेकायदेशीर वृक्षतोडीचा ठपका असणारे बहुतांश जण सन २००० पासून २०१० पर्यंत निवडून आले आहेत. प्रकरण जगजाहीर झाल्यानंतरही पुन्हा तेच निवडून येण्यासाठी कोणती जादू करतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नुकसान भरपाईची जबाबदारी निश्चित केलेल्या रकमेपेक्षा अधिक खर्च करून बहुतांश सदस्य म्हणून निवडून आले. निवडणुकीत भरमसाट खर्च करायचा; मात्र नुकसानीची रक्कम भरायची नाही, ही प्रवृत्तीही यातून स्पष्ट झाली आहे. (क्रमश:) दोघांना २५ हजार ६२ रुपयांची नोटीस...मारुती मगदूम व विद्यमान सरपंच संभाजी देसाई २००० पासून दोन पंचवार्षिकमध्ये सदस्य होते. त्यामुळे दोघांनाही प्रत्येकी नुकसान भरपाईपोटी २५ हजार ६२ रुपये वसुलीचा आदेश देण्यात आला आहे. आजरा गटविकास अधिकारी यांच्याकडे कारवाईसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल संशय येत आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्याकडून सहकार्य मिळत आहे. मात्र, गटविकास अधिकारी कारवाईला बगल देत आहेत. - कृष्णा कुंभार, ग्रामस्थ, निंगुडगे