शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पवारांचे वजन धनंजय महाडिकांच्या पारड्यात-राष्टवादीची मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 1:39 AM

राष्टवादी कॉँग्रेसच्या मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी खासदार धनंजय महाडिक यांनाच पुन्हा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी देण्यास

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांचा कडाडून विरोध

कोल्हापूर : राष्टवादी कॉँग्रेसच्या मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी खासदार धनंजय महाडिक यांनाच पुन्हा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी देण्यास कडाडून विरोध केला.

आमदार हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार आदीनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच महाडिक यांच्यावर ते पक्षविरोधी काम करत असल्याचा निशाणा साधला व कार्यकर्त्यांची मने दुखावली आहेत, ती दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले. स्थानिक नेत्यांनी टोकाचा विरोध केला, तरी राष्टÑवादीकडे आजच्या घडीला या मतदारसंघातून लढण्यासाठी सक्षम उमेदवार नसल्याने पक्षाध्यक्ष पवार यांनी खासदार महाडिक यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिल्याचे समजते. चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी मात्र पूर्ण बैठकीत कोणतीच भूमिका घेतली नाही.

पक्षांतून एवढा विरोध झाल्यामुळे राष्ट्रवादी तयार असली तरी महाडिक हेच त्या पक्षाची उमेदवारी स्वीकारतात का हाच कळीचा मुद्दा आहे. त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईतील राष्टÑवादी भवनमध्ये मतदारसंघनिहाय प्रमुख नेत्यांशी पक्षाध्यक्ष पवार यांनी चर्चा केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, अरुण गुजराथी, सुप्रिया सुळे, आदी नेते उपस्थित होते.

जिल्हा परिषद, महापालिकांसह नगरपालिका निवडणुकीत खासदार महाडिक यांनी पक्षविरोधी काम केले आहे. पक्षाच्या कार्यक्रमांना कधीही उपस्थित राहात नाहीत, युवा शक्ती व भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात कार्यक्रम राबवित असल्याची तक्रार नेत्यांनी केली. पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल. महाडिक यांनी केलेल्या चुका सुधारणार कशा? असा सवाल त्यांनी केला.

त्यावर महाडिक म्हणाले, ‘गेल्या निवडणुकीत राष्टÑवादीबरोबरच कॉँग्रेस, जनसुराज्य पक्षाने मदत केली आहे, हे पक्ष जिल्हा परिषद, महापालिकांसह इतर स्थानिकच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात होते, अशा परिस्थितीत आपण यापेक्षा वेगळी काय भूमिका घ्यायला पाहिजे, पक्षाने बोलावल्यानंतर कार्यक्रमांना गेलो आहे. प्रजासत्ताक, स्वातंत्र्यदिनासह इतर कार्यक्रमांना पक्षाच्या कार्यालयात हजर असतो.’

महाडिक यांना भाजपचाही पर्यायराज्यात सध्या सत्तेत असलेल्या भाजप व शिवसेनेत युती होण्यावरून तणाव आहे. भाजपने युतीसाठी नाक घासणार नसल्याचे स्पष्ट केले आहे; त्यामुळे दोन पक्षांत युती न झाल्यास महाडिक यांच्यासाठी भाजपचाही पर्याय असू शकतो.महाडिक यांना शरद पवार यांचे मोठे पाठबळ आहे, परंतु जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांनी विरोध केल्यास अडचणी निर्माण होतील, अशी भीती महाडिक यांना वाटते आणि तीत्यांनी पवार यांच्याकडे बोलून दाखविली आहे. याउलट भाजपमधून त्यांना पक्षीय, राजकीय व सत्तेची ताकद मिळू शकते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे त्यांना मोठे पाठबळ आहे.हसन मुश्रीफ यांचीही तयारीमुश्रीफ, ‘के. पी.’, ‘आर. कें.’सह सर्वांनीच विरोधाचा सूर आळवल्याने, मग उमेदवार कोण? अशी विचारणा पवार यांनी केली. यावर, ‘मी आहे की’ असे मुश्रीफ यांनी सांगितले; पण त्यावर पवार यांनी केवळ स्मितहास्य केले. पक्षाने मुश्रीफ यांचा विचार केला तर महाडिक यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तसेच दोन्ही काँग्रेसमधून मुश्रीफ यांंना पाठबळ मिळू शकते.डिनर डिप्लोमसीनंतरही विरोध कायमचतीन वेळा कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी महाडिक यांना सोबत घेऊन अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली. शिवाय त्यांच्या घरी जाऊन स्नेहभोजनही घेतले; त्यामुळे पक्षांतर्गत विरोध मावळला जाईल, अशी अपेक्षा होती; परंतु निवडणुका दारात आल्या असतानाही महाडिक यांच्या विरोधात पक्षाचे जिल्ह्यातील सर्वच नेते असल्याचे या बैठकीत दिसून आले.कोल्हापुरात रेकीगेल्या बैठकीत ‘आर. के.’ व लाटकर यांनी महाडिक यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे तिसºया फळीतील कार्यकर्त्यांचा महाडिक यांना विरोध असल्याचे चित्र रंगविण्यात आले. म्हणून मुंबईच्या बैठकीपूर्वी कोल्हापुरात प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये प्रत्येकाने आपआपल्या मतदारसंघात महाडिक गट राष्टÑवादीला अडचणीत आणण्यासाठी काय राजकारण करत आहे. याचा पाढा वाचला जावा, असे नियोजन केले होते.मला घेरण्यासाठीच ‘आपटें’ना संधीकागल विधानसभा मतदारसंघात मला घेरण्यासाठी भाजपसोबत महाडिक कुटुंबीय प्रयत्नशील आहेत. त्यातूनच ‘गोकुळ’चे अध्यक्ष म्हणून आजºयाचे संचालक रवींद्र आपटे यांना संधी दिली जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी निदर्शनास आणून दिले. आपटे यांच्याबाबत शुक्रवारी ‘लोकमत’ने वृत दिले आहे. या वृताची मुंबईत चर्चा झाली.‘के. पीं.’चा निशाणाभुदरगड तालुक्यातील राष्टवादीचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, के. जी. नांदेकर यांनी आपल्या विरोधात दंड थोपटले असताना धनंजय महाडिक त्यांच्या कार्यक्रमाला हजर राहून बळ देत असल्याची उघड तक्रार के. पी. पाटील यांनी केली.तटकरे, जयदत्त क्षीरसागर लोकसभा लढणारच्लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार तयारी सुरू केली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकूण सहा मतदारसंघांबद्दल चर्चा झाली. रायगड, जळगाव, कोल्हापूरमधील उमेदवार राष्ट्रवादीनं निश्चित केले आहेत, तर बीडमध्ये दोन नेत्यांची नावं चर्चेत आहेत. यातील एक नाव लवकरच निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

रायगड,मधून सुनील तटकरेंची उमेदवारी निश्चित झाली आहे, तर जळगावातून अनिल पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघासाठी जयदत्त क्षीरसागर आणि अमरसिंग पंडित यांची नावे चर्चेत आहेत. रावेर आणि परभणी मतदारसंघाबद्दलही या बैठकीत चर्चा झाली. मात्र अद्याप या मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित झालेले नाहीत. या दोन्ही ठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी एकमत होण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफ